Marriage Fraud Crime News Saam TV
देश विदेश

Man Marries 15 women : हा तर खरोखरचा लखोबा लोखंडे; १५ महिलांशी लग्न, चौघींनाही मुलंही झाली, नेमकं सांगायचा काय?

Crime News : महेश केबी नायक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bangalore Crime news : डॉक्टर, इंजिनीअर असल्याचं सांगत एका पठ्ठ्यानं तब्बल 15 महिलांची फसवणूक केली आहे. या महिलांशी लग्न करुन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

बंगळुरु पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश केबी नायक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कधी डॉक्टर तर कधी इंजिनीअर असल्याची थाप मारून तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत असे.

म्हैसूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशने 15 महिलांशी खोटे बोलून आणि फसवणूक करून लग्न केले आहे. महेशला म्हैसूरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. जिच्याशी त्याने या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले होते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

महेशने ज्या 15 महिलांशी लग्न केले, त्यापैकी चार महिलांना त्याच्यापासून मुले झाली असल्याची माहिती समोर येत आहे. महेशला अटक झाल्यानंतर अनेक महिला फसवणूक झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे आल्या आहेत. (Latest Marathi News)

महेशने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साईट्सचा वापर केला. बहुतेक वेळा तो स्वत:ला इंजिनीयर किंवा डॉक्टर असल्याचं सांगायचा. महेशने तुमाकुरू येथे बनावट दवाखाना उघडला होता.   (Crime News)

महेशला म्हैसूरच्या एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली जिच्याशी त्याने जानेवारी 2023 मध्ये शेजारच्या आंध्र प्रदेश राज्यातील एका गावात लग्न केले होते. लग्नानंतर महेशने दवाखाना उघडण्यासाठी पैशांची मागणी करून महिलेचा छळ सुरू केला. त्याच्या वागण्याला कंटाळून महिलेने नंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने त्याला पैसे न दिल्याने त्याने तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.

महेशने लग्न केलेल्या महिला सुशिक्षित आणि स्वावलंबी असल्याने त्या आर्थिक गरजांसाठी त्याच्यावर अवलंबून नव्हत्या. मात्र या अनेक महिलांनी बदनामी टाळण्यासाठी फसवणूक झाल्याचे कळल्यानंतरही तक्रार दाखल केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT