म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा भडका उडालाय. इथल्या रखाइन प्रांतातल्या एका रुग्णालयावर 10 डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात 30 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यात 70 लोक जखमी झाले. असं म्हणतात की बंडखोर गट अराकन आर्मी'चे सैनिक या रुग्णालयात उपचार घेत होते. म्यानमारच्या लष्करानं किंवा सरकारनं या एअर स्ट्राईकबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारच्या लष्करानं लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारला उलथून पाडलं. आंग सान सू ची यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने 2020 च्या निवडणुकांमध्ये मोठं बहुमत मिळवलं होतं, मात्र लष्कराने निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सत्ता हाती घेतली. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली, जी लष्कराने हिंसक दडपशाहीने मोडून काढली. काही लोकांनी 'पीपल्स डिफेन्स फोर्स' (PDF) ची स्थापना केली, त्याचबरोबर, कारेन नॅशनल युनियन, काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन देखील लष्कराच्या विरोधात लढत आहेत. हे गट दशकांपासून स्वतंत्र सरकारची मागणी करतायेत.
बंडखोर गटांनी 2024 पर्यंत देशातील सुमारे 40 ते 50 टक्के भूभागावर, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये नियंत्रण मिळवलं होतं. मात्र 2025 मध्ये लष्करानं प्रतिआक्रमण सुरू केलंय. ऑक्टोबर 2025 मध्ये लष्करानं 'ता'अंग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून क्यौकमे शहर परत घेतलं. मात्र लष्कराचं अजूनही यांगून, नायपीडॉ यासारखी मोठी शहरं आणि राजधानीवर नियंत्रण आहे. या संघर्षादरम्यान, चीनने लष्कराला मदत दिलीय. त्यामुळे बंडखोर गट आणखीनच आक्रमक झालेत. आता या एअर स्ट्राईकमुळे लष्कराविरोधात संतापाची लाट उसळलीय. हे असंच सुरू राहिलं तर म्यानमारमध्ये अराजकता अटळ आहे.
1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्करानं लोकशाही सरकार उलथवून लावलं
आंग सान सू ची यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीला बहुमत
निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा लष्कराचा आरोप
देशभरात लष्कराविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं
लष्कराने हिंसक दडपशाहीने आंदोलनं मोडून काढली
लष्कराविरोदात पीपल्स डिफेन्स फोर्स (PDF) ची स्थापना
कारेन नॅशनल युनियन, काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन लष्कराच्या विरोधातील गट
या गटांकडून स्वतंत्र सरकारची मागणी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.