Basti Hindu Muslim Marriage : आतापर्यंत आपण प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेली जोडपी पाहिली. त्यांच्या अंर्तमुख करणाऱ्या प्रेमकहाणीमुळे पुन्हा एकदा आपलं निर्मळ प्रेमावर विश्वास बसतो. उत्तर प्रेदशमध्ये प्रेमात धर्म बदलल्याचा प्रकार समोर आलाय. बस्ती जिल्ह्यातील एका मुस्लिम युवकाने प्रेमासाठी धर्म बदलला. प्रेयसी अनु सोनीसाठी सद्दामने हिंदू धर्म स्वीकारला. दोघांनी हिंदू परंपरेप्रमाणे लग्न केले. सद्दामने आपले नाव बदलून शिव शंकर सोनी असे केलेय. बस्तीमध्ये सद्दाम आणि अनु यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे.
बस्ती जिल्ह्यातील एका मुस्लिम तरूणाने प्रेमासाठी आपले नाव आणि धर्म बदललाय. रीती-रिवाजप्रमाणे मंदिरात दोघांनी लग्न केलेय. बस्तीमधील नगर येथे राहणारा सद्दाम अनू सोनी हिच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रेम सुरू होतं. पण धर्म वेगवेगळे असल्यामुळे अडचण येत होती. अखेर सद्दाम प्रेमासाठी आपला धर्म आणि नाव बदलण्याचा निर्णय घेतल. त्यानं हिंदू धर्म स्वीकराला अन् आपले नाव शिवशंकर सोनी केलं. दोघांनी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे शंकराच्या मंदिरात लगीन गाठ बांधली. प्रेमासाठी धर्म आणि नाव बदलणाऱ्या सद्दाम उर्फ शिव शंकर याची बस्ती जिल्ह्यात चर्चा आहे.
सद्दाम आणि अनु दहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. त्यांच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीपासून झाली. अनु आणि सद्दाम यांनी कोणत्याही परिस्थितीत सोबतच राहण्याचं ठरवलं. सद्दामच्या कुटुंबियांनी अनु सोनीला स्वीकारण्यास नकार दिला. सद्दाम तरीही अनुसोबत लग्न करण्यावर ठाम होता, त्यामुळे कुटुंबियांनी त्याच्यासोबतचं नातं तोडलं. कुटुंबियांनी सद्दामला घराबाहेर काढलं होतं.
सद्दाम एकवेळ कुटुंबाच्या दबावात आला, त्यानं अनुला लग्नास नकार दिला. अनुने रागाच्या भरात पोलिसात तक्रार दिली होती. पण त्यानंतर दोघांनी मिळून मार्ग काढला. सद्दामने मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रविवारी हिंदु रिती रिवाजाप्रमाणे लग्न केलं. उत्तर प्रदेशमध्ये याची चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.