UN report on rising sea levels Mumbai and Kolkata Saam TV marathi
देश विदेश

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

Mumbai Sea Level Rise : जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई आणि कोलकात्यासह किनारपट्टीवरील शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

UN report on rising sea levels Mumbai and Kolkata : जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या दोन मोठ्या शहरांना बसण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोलकाता ही दोन शहरे कायमस्वरूपी बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे (UN) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी यासंदर्भात संपूर्ण जगाला आणि भारताला गंभीर इशारा दिला आहे. मुंबई-कोलकातामधील १० दशलक्षाहून अधिक लोकांवर आपली घरे कायमची गमावण्याचा धोका आहे.

समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. पुढील काही दिवसांत पातळी आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोलकाता आणि मुंबईतील लाखो लोकांची घरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. वाढत्या समुद्र पातळीमुळे जगभरातील किनारपट्टीवरील शहरांमध्ये आधीच बदल होत आहे. लोकांचे जीवन, उपजीविका आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा धोक्यात आल्या आहेत, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

UN च्या अहवालात नेमकी काय माहिती समोर आली आहे?

सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचा 'समुद्र पातळी वाढीशी संबंधित आव्हाने आणि त्यावर उपाययोजना' हा अहवाल प्रसिद्ध झाला. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या आणि बर्फाचे डोंगर अतिशय वेगाने वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वेगाने वाढत आहे. समुद्राच्या वाढत्या पाण्यामुळे मुंबई आणि कोलकात्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना आपली घरे गमवावी लागण्याची भीती तयार झाली आहे.

समुद्राची पातळी वाढल्याने फक्त घरेच नाही, तर मुंबई आणि कोलकाता या दोन्ही शहरांमधील पायाभूत सुविधा, रस्ते, विमानतळ आणि अब्जावधी रुपयांची मालमत्ता पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात मोठं आर्थिक संकट उभे राहू शकते, असे इशारा अहवालात देण्यात आला आहे. समुद्राची पातळी वाढण्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. दीर्घकालीन विकास आणि आर्थिक स्थिरतेला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

अमेरिकेलाही फटका -

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार समुद्राची वाढती पातळी आणि भूस्खलनामुळे मियामी, न्यूयॉर्क व ग्वांगझू यांसारख्या शहरांमधील २ ते ३.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या किनारी पायाभूत सुविधांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. याशिवाय पुराचा धोका वाढल्याने जीवितहानी, मालमत्ता, उपजीविका आणि जल परिसंस्थांचे नुकसान होत आहे. यामुळे स्वच्छता पायाभूत सुविधांचे नुकसान होऊन पाण्यामुळे पसरणारे आजार, मृत्यू आणि मानसिक त्रास वाढून सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

समुद्राच्या पातळीत वेगाने वाढ

समुद्राच्या पातळीत होणारी ही वाढ प्रामुख्याने मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे अहवालात सांगितलेय. तापमान वाढीमुळे हिमनद्या वितळत आहेत आणि महासागर गरम होत आहेत. २०१४ ते २०२३ दरम्यान समुद्राची पातळी दरवर्षी ४.७ मिमीने वाढली. तर २०२४ मध्ये तिने ५.९ मिमीची नोंद करत नवीन विक्रम प्रस्थापित केला. काही भागांत महासागराचे तापमान गेल्या ४,००० वर्षांतील सर्वात वेगाने वाढले आहे.

२०५० पर्यंत हा दर अजून वाढण्याची शक्यता आहे. अहवालानुसार जगातील सुमारे १० टक्के लोकसंख्या म्हणजेच जवळपास ७७ कोटी लोक किनारपट्टीच्या भागात राहतात. त्या सर्वांवर मोठा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांत बैठक सुरू

Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

QR Payment : गुगल पे, फोनपे, QR कोड पेमेंट स्वीकारणे बंद होणार? 'हा' नियम लगेच जाणून घ्या

High blood pressure: रोज सकाळी BP वाढतोय? ही 5 ड्रिंक्स नैसर्गिकरित्या कमी करतील रक्तदाब

Stress Increase Diabetes: टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का? जाणून घ्या डायबिटीजच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी

SCROLL FOR NEXT