डायबिटीज असणाऱ्यांनी सफरचंद खावे की टाळावे?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज सामान्य असला तरी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

Apple For Diabetes | saam tv

आरोग्याची घ्या काळजी

डायबिटीजच्या रूग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष दिले नाही तर रक्तातील साखरेवर परिणाम होतो.

Diabetes | pinterest

डायबिटीजच्या रूग्णांनी सफरचंद खावे की नाही?

शरीरातील रक्ताची पातळी वाढू नये यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी सफरचंद खावे की नाही हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

apple | pinterest

गुणकारी सफरचंद

डायबिटीजच्या रूग्णांसाठी सफरचंदाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. सफरचंदातील फायबर, व्हिटॅमिन सी, कार्बोदके आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

Apple For Diabetes | pinterest

सफरचंद खाण्याची पद्धत

सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर आणि पौष्टिक घटक असतात यासाठी सफरचंदाची साल काढून खाण्याऐवजी ती स्वच्छ धुऊन सालीसकट खावी.

Apple For Diabetes | pinterest

ग्लायसेमिक इंडेक्स

सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. सफरचंद खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढत नाही, ती हळूहळू वाढते.

apple | pinterest

फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स

सफरचंदाच्या सालीमध्ये आणि गरामध्ये भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असते. हे फायबर रक्तातील साखरेचे शोषण मंदावते, ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

apples | saam tv

इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते

सफरचंदातील 'पेक्टिन आणि अँटीऑक्सिडंट्स जे शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

Apple | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

| Saam TV

NEXT: Gold Mangalsutra Bracelet: 22 कॅरेट सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र ब्रेसलेट, लेटेस्ट 5 डिझाईन्स

22 Karat Gold Mangalsutra Bracelet
येथे क्लिक करा...