Manasvi Choudhary
सध्याच्या फॅशनच्या युगात गळ्यात घालण्याऐवजी हातामध्ये मंगळसूत्र ब्रेसलेट घालण्याची नवी फॅशन प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या सामान्य महिलांपर्यंत सर्वच जणी या मॉडर्न ज्वेलरीला मोठी पसंती देत आहेत. तुम्हीदेखील युनिक शोधत असाल तर हे मंगळसूत्र ब्रेसलेट निवडा.
अत्यंत बारीक काळे मणी आणि मध्ये छोटेसे सोन्याचे किंवा डायमंडचे डिझायनर पेंडंट असलेले हे ब्रेसलेट रोजच्या वापरासाठी अतिशय कंम्फर्टेबल आणि सुंदर दिसते.
सध्या डबल लेयरचे मंगळसूत्र ब्रेसलेट खूप ट्रेंडमध्ये आहे. हे हातामध्ये घातल्यावर युनिक लूक देते.
सोन्याच्या चेनमध्ये फुलांची किंवा पानांच्या आकाराचे आणि मध्ये काळ्या मोत्यांची डिझाईन असलेले हे ब्रेसलेट तुम्ही निवडू शकता.
ज्या महिलांना हेव्ही दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी मिनिमल आणि सोबर डिझाईन्समध्ये ब्रेसलेट मंगळसूत्र आहे.
ब्रेसलेट अशा प्रकारे डिझाईन केलेले असते की ते वेस्टर्न आणि एथनिक आऊटफिट्सवर मॅच होते.