देश विदेश

Mumbai Crime: '₹५०० दे अन् खोलीत चल...' जळगावचा व्यापारी मुंबईत हनी ट्रॅपमध्ये अडकला, मुलींनी असं काही केले की...

Mumbai Honeytrap Case: मुंबईत महिलांच्या हनीट्रॅप टोळीने पुरुषांना फसवून लुटल्याची घटना उघडकीस आली. ४६ वर्षीय जळगावच्या व्यावसायिकाला ३५,००० रुपयांमध्ये फसवून अटक करण्यात आली आहे.

Dhanshri Shintre

  • गिरगाव परिसरात महिलांच्या टोळीने व्यावसायिकाला फसवून ३५,००० रुपये लुटले.

  • पोलिसांनी मजिता बेबी नूर, रूपा विश्वनाथ दास आणि नसीमा जमाल शेख यांना अटक केली.

  • चौथ्या आरोपी महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.

  • या प्रकरणामागे मोठ्या खंडणी रॅकेटचे धागेदोरे असल्याची शक्यता.

मुंबईत महिलांच्या एका टोळीने पुरुषांना फसवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तिघी महिलांना अटक करण्यात आली असून पोलिस चौकशीदरम्यान या टोळीने इतर अनेक पुरुषांचाही बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेत जळगावमधील ४६ वर्षीय व्यावसायिकाला फसवून ३५,००० रुपये लुटण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, पीडित व्यावसायिक २३ सप्टेंबर रोजी मुंबईत व्यवसायाच्या कामानिमित्त आला होता. सीएसएमटी(CSMT) स्थानकावर पोहोचल्यावर त्याची एका अनोळखी महिलेशी ओळख झाली. बोलण्याच्या नादात त्या महिलेनं त्याला ५०० रुपयांच्या बदल्यात शारीरिक संबंधांची ऑफर दिली.

व्यावसायिकानं ही ऑफर स्वीकारल्यानंतर ती महिला त्याला टॅक्सीने गिरगाव परिसरातील भारत भवन हॉटेलजवळील एका इमारतीत घेऊन गेली. वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेल्यानंतर त्याला तिथं आणखी एक महिला दिसली. काही क्षणांतच पहिली महिला आरडाओरडा करू लागली आणि व्यावसायिकावर तिचा व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप केला.

त्यानंतर अचानक आणखी तीन महिला खोलीत शिरल्या आणि त्यांनी व्यावसायिकाला धमकावत आर्थिक खंडणी मागितली. घाबरलेल्या व्यावसायिकाला त्यांनी २२,००० रुपये ऑनलाइन पाठवायला भाग पाडले तसेच त्याच्या पाकिटातील १३,००० रुपये जबरदस्तीने घेतले. या घटनेनंतर तो व्यक्ती जळगावला परतला पण ३० सप्टेंबर रोजी धैर्य एकवटून त्याने व्हीपी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु करून ऑनलाइन ट्रान्सफरची पडताळणी केली आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.

या तपासातून मजिता बेबी नूर (३५), रूपा विश्वनाथ दास (४७) आणि नसीमा जमाल शेख (३८) या तिघींना अटक करण्यात आली आहे. या गटात आणखी एक महिला सामील असल्याचा संशय असून तिचा शोध सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की या टोळीने इतरही पुरुषांना अशाच पद्धतीने फसवले असण्याची शक्यता आहे. काही पीडित सामाजिक कलंकाच्या भीतीने पुढे यायला टाळाटाळ करत असल्याचंही समोर आलं आहे. पोलिस आता या महिलांचा मोठ्या खंडणी रॅकेटशी काही संबंध आहे का याचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farah Khan: 'फराह खानने मला खूप मारलं...'; शाहरुख खानच्या या जवळच्या व्यक्तीने केला धक्कादायक खुलासा

Ratnagiri Tourism : रत्‍नागिरीतील 'हे' ठिकाण पाहिलं नसंल तर सुट्टीत आवर्जून भेट द्या

Crime News : मित्रानेच काढला मित्राचा काटा, जुन्या वादातून डोक्यात तिडीक गेली अन् जीव घेतला, भिवंडीत रक्तरंजित थरार

Flight Travel: विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टी नेण्यास आहे बंदी?

Maharashtra Politics : राजकीय समीकरण बदलणार; बदलापुरातील बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT