संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईच्या दहिसर परिसरातून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेचे तब्बल 12 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली. मात्र अवघ्या अर्धा तासात दहिसर पोलिसांनी परिसरातील २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर रिक्षाचा शोध घेतला. पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे महिलेला तिचे दागिने परत मिळाले आहेत. दहिसर पोलिसांच्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेला दागिने परत मिळाल्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचं पाहायला मिळालं. बॅग परत मिळाल्यानंतर महिलेने दहिसर पोलिसांचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरातील महिला ही घरातून सोन्याने भरलेली बॅग घेऊन देवदर्शनासाठी पुण्याला जाण्यासाठी निघाली. त्यासाठी तिने बोरिवली एसटी डेपोपर्यंत जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. महिलेकडे तीन ते चार बॅगा असल्यामुळे तिने काही बॅगा रिक्षाच्या डिक्कीमध्ये ठेवल्या. बोरवली एसटी डेपोमध्ये पोहोचल्यानंतर उतरताना महिलेने सीटवरील आणि डिक्केतील दोन बॅगा घेऊन तात्काळ एसटी बसने पुण्याकडे निघाली. मात्र एसटीने काही अंतर पार केल्यानंतर मौल्यवान सोन्याचे दागिने असलेली बॅग आपण विसरलो असल्याचे महिलेच्या लक्षात आले.
मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांची बॅग नजरेस न दिसल्यामुळे महिला प्रचंड घाबरून गेली. तिने ताबडतोब याबाबत माहिती दहिसर पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तपासासाठी दोन वेगवेगळी पथके तयार केली. परिमंडळ बाराचे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास पथकाला तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकाने अवघ्या अर्ध्या तासात 20 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि ऑटोरिक्षा ओळखली. पोलिसांनी रिक्षाचा नंबरवरून रिक्षा चालकाचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर त्याला फोन करून दागिन्यांची बॅगेबाबत माहिती दिली. रिक्षाचालकाने बॅग आपल्याकडे असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी ती दागिन्यांनी भरलेली बॅग जप्त केली. पोलिसांनी आज शनिवारी पीडित महिलेला बोलावून तिची सोन्याने भरलेली बॅग परत केली. बॅग मिळाल्यानंतर महिला सिलीमकर आणि त्यांच्या पतीने दहिसर पोलिसांचे आभार व्यक्त केले. तसेच सिलिमकर पती-पत्नीने बॅग मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.