गुरुग्राम, हरियाणा : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांचे शनिवारी दुपारी निधन झाले आहे. त्यांना अनेक दिवसांपासून फुफ्फुसाचा त्रास होता. प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात (medanta hospital gurugram) दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच मुलायमसिंह यादव मेदांता येथे रवाना झाले आहेत. कुटुंबातील इतर सदस्यही रुग्णालयात पोहोचू शकतात. साधना यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. (Sadhana Yadav Death News)
हे देखील पाहा -
रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या. साधना गुप्ता या दीर्घकाळापासून फुफ्फुसाच्या समस्येशी झुंज देत होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये भरती होत्या. औषधोपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी साधना गुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, "माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांच्या निधनाची दु:खद बातमी मिळाली. मुलायम सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची हिंमत देवो." असं ट्विट करत त्यांनी साधना गुप्ता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
2003 पर्यंत साधना गुप्ता यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. 2003 ला मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नी आणि अखिलेश यादव यांच्या आई मालती यादव यांचे निधन झाले होते. त्यानंतर साधना गुप्ता यांना 2003 मध्येच मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीचा दर्जा मिळाला होता.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.