Mukesh Ambani and PM Modi Saam Tv
देश विदेश

Mukesh Ambani Praises PM Modi: मोदी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान : मुकेश अंबानी

Mukesh Ambani At Vibrant Gujarat 2024 : 'व्हायब्रंट गुजरात'च्या उद्घाटन प्रसंगी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचं खुलेपणानं कौतुक केलंय. ते नक्की काय बोलले, हे आपण जाणून घेवू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mukesh Ambani Praise PM Modi At Vibrant Gujarat

गुजरातमध्ये गुंतवणूकदार परिषद 'व्हायब्रंट गुजरात-2024' आज उद्घाटन झालंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील (PM Modi) स्वतः अहमदाबादला हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे देश-विदेशातील उद्योगपतीही येथे जमले आहेत. उद्घाटन सत्रादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचं खुलेपणानं कौतुक केलंय. त्यांनी पंतप्रधान मोदींचं वर्णन 'देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान' असे केलं आहे. (latest business news)

यासोबतच यावेळी राज्यातील गुंतवणुकीबाबतही अनेक घोषणा करण्यात आल्या. गुजरातबाबत इतर उद्योगपतींनीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. आपल्या भाषणात मुकेश अंबानी यांनी गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचं प्रवेशद्वार असल्याचं म्हटलंय. यावेळी रिलायन्सबद्दल ते म्हणाले की, ही एक गुजराती कंपनी होती, आहे आणि ती कायम राहील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंबानी लवकरच गिगा कारखाना सुरू करणार

यादरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुजरातमध्ये लवकरच त्यांचा बॅटरी उत्पादन कारखाना सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांची कंपनी 2024 च्या उत्तरार्धात गुजरातमध्ये गीगा कारखाना सुरू करण्यास तयार आहे. येत्या काही वर्षांत गुजरात भारताच्या आर्थिक विकासाचं प्रवेशद्वार बनेल.

राज्याचा जीडीपी 2047 पर्यंत 3000 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल आणि 2047 पर्यंत भारताला 35 बिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. रिलायन्स गुजरात राज्यातील हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे.

अदानी, मित्तल, टाटा, मारुतीच्या मोठ्या घोषणा

व्हायब्रंट गुजरातमध्ये अदानी समूहाचे गौतम अदानी, आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तल, टाटा समूहाचे एन. चंद्रशेखरन आणि मारुती सुझुकीचे तोशिहिरो सुझुकीही सहभागी झाले होते. या सर्वांनी आगामी काळात गुजरातमधील गुंतवणूक योजनांबाबत मोठ्या घोषणा केल्या (Vibrant Gujarat 2024) आहेत.

गुजरातमध्ये दुसरा प्लांट उभारण्यासाठी मारुती 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूह धोलेरा येथे मोठा सेमीकंडक्टर कारखाना उभारत आहे. याशिवाय लिथियम-आयन बॅटरी बनवण्यासाठी 2 महिन्यांत साणंदमध्ये 20 GW क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू होणार आहे. पेटीएमने गिफ्ट सिटीमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. अदानी समूह गुजरातमध्ये पुढील 5 वर्षांत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. यामुळे सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील. अदानी समूह कच्छमध्ये 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला 30 GW क्षमतेचा ग्रीन एनर्जी पार्क विकसित करत आहे. आर्सेलर मित्तल हाजीरा येथे 2029 पर्यंत जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट सुरू करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT