Madhya Pradesh Boat capsized: Saamtv
देश विदेश

MP Boat capsized: वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; पाच चिमुकल्यांसह ७ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Boat capsized: मध्यप्रदेशमध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ५ चिमुकल्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Gangappa Pujari

मध्यप्रदेश: ता. २ जून २०२४

मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. श्योपूर जिल्ह्याच्या सिप नदीत ११ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत पाच चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटली. या दुर्घटनेत बोटीतील 11 प्रवासी नदीत बुडाले, यामधील 4 जण पोहून किनाऱ्यावर आले. तर वेळी ५ मुलांसह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले.

दुर्घटनेतील सर्व प्रवासी हे स्थानिक रहिवासी असून माळी समाजातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व जण बोटीने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे निघाले होते. अचानक आलेल्या वादळामुळे त्यांची बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ११ जण होते. ज्यांपैकी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले.

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. तेथे उपस्थित लोकांनीही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सात मृतांमध्ये 4-15 वर्षे वयोगटातील पाच मुले, एक 35 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळ फटका, विदर्भाला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

Mahayuti: भाजपचं ऑपरेशन लोटस! महायुतीतच मित्र पक्षांमध्ये फोडाफोडी; राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंना दे धक्का

SCROLL FOR NEXT