देश विदेश

CM Helicopter: हवेत झेपावताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; वरती जाण्याऐवजी खाली आलं अन्...

CM Helicopter Loses Control : मध्य प्रदेशातील खंडवा येथे उड्डाण घेतानाच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अचानक पुढे जाण्याऐवजी मागे सरकू लागले, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयाची ठोके चुकले.

Bharat Jadhav

  • मध्य प्रदेशातील खंडवा येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड

  • उड्डाण घेताच हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटल्याने भीतीचं वातावरण

  • उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली

अजित पवार यांचा अपघात नसून त्यांचा घात करण्यात आल्याचा संशय आमदार रोहित पवार घेतलाय. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलंय. विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. उड्डाण घेताच हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं आणि ते हवेत वाकडं-तिकडं होऊ लागलं, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

मध्य प्रदेशातील खंडवा येथे मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना होताना टळली. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टर अपघात होण्यापासून थोडक्यात बचावलं झाला. उड्डाण करताच हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी मागे जाऊ लागले. सुदैवाने अनर्थ टळला. दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मोहन यादव हे खंडवा येथे पंधाना येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी जात होते.

न्यूज१८ च्या वृत्तानुसार खांडवा येथील पंधना येथून उड्डाण घेताना मुख्यमंत्री मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर अचानक पुढे जाण्याऐवजी मागे-खाली झुकू लागले. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आणि सुरक्षा कर्मचारी घाबरले. पायलटने हेलिकॉप्टर हुशारीने हाताळले. जेव्हा हेलिकॉप्टर हवेत सुरक्षितपणे स्थिरावले आणि पुढील प्रवासासाठी निघाले, तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death: 'पालखी निघाली राजाची' गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्तांमध्ये हळहळ

कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Sunday Horoscope: आर्थिक लाभ होणार, सुर्याच्या कृपेने 5 राशींचे आयुष्य भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sachin Tendulkar: हेल्मेट कुठे आहे? पुण्याच्या रस्त्यावर अचानक सचिन प्रकटला, नेमकं काय घडलं? VIDEO

Chanakya Niti: चांगल्या वेळेत साथ अन् वाईट काळात दुरावा, या ५ हंसाच्या स्वभावासारख्या व्यक्तींपासून राहा लांब

SCROLL FOR NEXT