MP Election 2023: Saam Tv
देश विदेश

MP Election 2023: मध्य प्रदेशात तिकीट वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, तुफान हाणामारीचा VIDEO आला समोर...

MP Viral Video: 'या' राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार, इशारा हवामान खात्याचा इशारा

Satish Kengar

MP Election 2023:

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी आपली पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये 92 उमेदवारांची नवे जाहीर करण्यात आली. यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत कलहही समोर आला आहे.

भाजपची पाचवी यादी जाहीर होताच जबलपूरमध्ये गदारोळ झाला. अभिलाष पांडे यांना तिकीट देण्याच्या आणि शरद जैन यांना तिकीट न दिल्याच्या निषेधार्थ जबलपूर उत्तर विधानसभेच्या जागेवर शेकडो भाजप कार्यकर्ते एकत्र आले. हा सगळा गोंधळ सुरू असताना भाजप कार्यालयात निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित होते, त्यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी भूपेंद्र यादव यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण केली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिकीट जाहीर झाल्यानंतर झालेल्या गदारोळावर राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विवेक तंखा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप कार्यालयात निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिले, जबलपूरमध्ये तिकीट वाटपावरून भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजप कार्यालयात निदर्शनादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्याविरोधातही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.  (Latest Marathi News)

दरम्यान, अभिलाष पांडे यांना मध्य उत्तर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली असून, ते जिल्ह्याच्या पश्चिम विधानसभेचे रहिवासी आहेत. अभिलाष हे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांचे समर्थक मानले जातात. या जागेवरून शरद जैन, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष धीरज पटारिया, शरद अग्रवाल आणि कमलेश अग्रवाल हे प्रमुख दावेदार होते.

शरद जैन 2003 ते 2018 पर्यंत या जागेवरून आमदार होते आणि ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. मंत्री असताना गेल्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या 550 मतांनी पराभव झाला. धीरज पटारिया यांनी बंडखोर उमेदवार म्हणून मागील निवडणूक लढवली होती आणि त्यांना सुमारे 30 हजार मते मिळाली होती. जे भाजप उमेदवाराच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. असं असतानाही अभिलाष पांडे यांना तिकीट दिल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आपली नाराज व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT