MP Assembly Election Saam Digital
देश विदेश

MP Assembly Election: निवडणूक लढवण्यासाठी कर्ज काढलं, राजधानीपर्यंत बाईकवरून ३५० किमी प्रवास, झोपडीत राहणाऱ्या आमदाराची संघर्षमय कहाणी

MP Assembly Election: आदिवासी समाजासाठी लढणारा एक खोडकर मुलगा, सडपातळ शरीर, उंची सुमारे साडेपाच फूट आणि वय ३३ वर्षे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालाच्या काही तास आधी कमलेश्वर दोडियारची अशी ओळख होती.

Sandeep Gawade

MP Assembly Election

आदिवासी समाजासाठी लढणारा एक खोडकर मुलगा, सडपातळ शरीर, उंची सुमारे साडेपाच फूट आणि वय ३३ वर्षे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालाच्या काही तास आधी कमलेश्वर दोडियारची अशी ओळख होती. मात्र निकालानंतर ही ओळख आता 'आदरणीय आमदार कमलेश्वर दोडियार' अशी बदलू लागलेय. मध्य प्रदेशमध्ये सध्या कमलेश्वर दोडियार यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या चर्चेच्या विषय बनले आहेत. मात्र कमलेश्वर दोडियार ना भाजपमधून निवडणूक लढलेत ना कॉंग्रेसमधून. या नवनिर्वाचित आमदाराचा पक्ष आहे BAP अर्थात भारत आदिवासी पक्ष.

राजस्थानमध्ये जन्मलेले भारत आदिवासी पक्षाचे उमेदवार कमलेश्वर यांना निवडणुकीत विजयानंतर विधासनसभा सचिवालयात कागदपत्र जमा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. यासाठी ते रतलाम जिल्ह्यातून भोपाळला पोहोचले. मात्र दुचाकीवरून तब्बल ३५० किमीचा प्रवास करत ते भोपाळला पोहोचले. दुचाकीवरू त्यांना ८-९ तास प्रवास करावा लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, कार्यकर्त्यांनी मला सर्वतोपरी मदक केली. निवडणुकीत त्यांच्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला. मात्र निवडणुकीच्या प्रचारात सगळे थकले आहेत. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा वारपर यावेळीही करायचा नव्हता. दरम्यान विधानसभा सचिवालयातूनही कागदपत्र जमा करण्यासाठी फोन केले जात होते. बुधवारी घरातून निघाल्यानंतर ट्रेनची वाट पाहिली मात्र वेळेवर न आल्यामुळे मेव्हण्याच्या बाईकवरू भोपाळला आल्याचे त्यांनी सांगितलं.

तुम्ही दोघांनीही हेल्मेट का घातले नाही या प्रश्नावर ते म्हणाले, नुकताच निवडणुकीत खूप खर्च झाला आहे. एक हेल्मेट घेण्याइकेही आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. आता लवकरच आम्ही नवीन हेल्मेट तयार करणार आहे. बाप पक्षाच्या या उमेदवाराने निवडणुक लढवण्यासाठी १२ लाख रुपये कर्ज काढलं आहे. दरम्यान त्याने या कर्जाची परतफेड करण्यासाठी नोतराद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. नोतरा ही मध्य प्रदेशमधील एक सामाजिक संस्था आहे. ही या संस्थेमार्फत भिल्ल समाज आपल्या समाजातील लोकांना मदत करतो.

कमलेश्वर सांगतात की, २००८-९ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याची बातमी ऐकून आश्चर्य वाटले. एक साधा केनिया सोडून अमेरिकेत स्थायिक झालेला संघर्ष करणारा एक साधामाणुस अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. बराक ओबामांकडूनच मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. रघुकुआं या गावात स्थायिक होण्यापूर्वी कमलेश्वरचे वडील रतलामपासून २५ किमीवर असलेल्या गावात रहात होते. मात्र गरिबीमुळे कुटुंबाला ते गाव सोडावं लागवं. सध्या आमचं सर्व कुटुंब झोपडीतच राहतं. वडिलांचे हात आता चालत नाहीत तर आई रोजंदारीवर काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT