Uttar praedesh crime  Saam tv
देश विदेश

माय-लेकीची निर्घृण हत्या,जवळच्या व्यक्तीनेच दगा दिला; ११ दिवसांनी उलगडलं हत्येचे गूढ

Uttar praedesh crime : उत्तर प्रदेशमध्ये माय-लेकीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Vishal Gangurde

गोरखपूरमध्ये माय-लेकीच्या हत्येचं गूढ ११ दिवसांत उलगडलं

कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे समोर

आरोपीने दोघांना दारू पाजून हातोड्याने ठार दोघांना केले

८०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील घोषीपुरवामध्ये माय-लेकीची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. ११ दिवसांनंतर दोघांच्या हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी दोघांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीने दोघांना संपवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. रितेश असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रितेश हा ५५ वर्षीय विमला यांना मावशी म्हणून हाक मारायचा. रितेशची त्यांच्या घरात नेहमी येजा असायची. याच ओळखीचा फायदा घरात चोरीचा कट रचला. रितेशने २४ नोव्हेंबर रोजी विमला आणि त्यांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. रितेशने आधी दोघांना दारू पाजली.

दोघांनी दारू प्यायल्यानंतर रितेशने त्यांच्या डोक्यात हातोड्याने हल्ला केला. या जीवघेणा हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रितेश घरातील ४.५ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला. रितेशला पैशांची चणचण भाजप भासत होती. गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी त्याला पैशांची गरज भासायची. यामुळे त्याने चोरी करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून अधिकचे पैसे खर्च करू लागला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी हत्याकांडानंतर आजूबाजूच्या परिसरात अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिसांनी एकूण ८०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी परिसरातील अनेक लोकांची चौकशी केली.

आरोपी रितेशच्या ऑनलाइन ट्रान्जेक्शनमुळे त्याच्यावरील संशय बळावला. चौकशीदरम्यान रितेशने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याच्याकडील वितळलेले सोने, पैशांची रोकड आणि हत्या करताना वापरलेला हातोडा जप्त केला. त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात गोंधळ; दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

Maharashtra Live News Update: सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार

Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

ST Bus: यापुढे शाळांच्या सहलीसाठी फक्त 'लालपरी'च, खासगी बस वापल्यास होणार कारवाई; नवे नियम काय?

ठाकरेंना धक्का बसणार? महत्त्वाच्या शिलेदाराची सरनाईकांसोबत चर्चा, वाचा भेटीत दडलंय काय

SCROLL FOR NEXT