जगातील सर्वाधिक महागडी शाळा
१ कोटी रुपये फी अन् लक्झरी सुविधा
६० देशांतील मुले घेतात शिक्षण
शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षणाने आपण सर्वकाही बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घ्यायला हवे. शिक्षणाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. आयुष्य बदलून जाते. दरम्यान, सध्या शाळाचा खर्च खूप महागला आहे. शाळांनी फी लाखो रुपये झाली आहे. दरम्यान, जगात एक शाळा अशी आहे की ज्या शाळेची फी १ कोटींपेक्षा जास्त आहे. याचसोबत या शाळांमध्ये अनेक लक्झरी सुविधादेखील मिळतात.
स्विझरलँड Institut Le Rosey ही देशातील सर्वात महागडी शाळा आहे. या शाळेची फी कोट्यवधी रुपये आहे. १८८० मध्ये पॉल-एमिल कार्नल यांनी या शाळेची स्थापना केली होती. या शाळेला स्कूल ऑफ किंग्स असं म्हणतात. या शाळेत अनेक देशातील शाही कुटुंबातील मुलं शिक्षण घेतात.
मिडिया रिपोर्टनुसार, या शाळेची दरवर्षीची फी १,१३,७३,७८० रुपये फी आहे. म्हणजे जवळपास १ लाख १४ हजार रुपये फी द्यावी लागणार आहे. यामध्ये तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, म्यूझिक, खेळ, हॉर्स रायडिंग अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
या शाळेत ६० देशांमधील विद्यार्थी शिकतात. जवळपास ४५० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. १२० शिक्षक या शाळेत शिकवतात. म्हणजेच ३ ते ४ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक शिकवतात.
Institut Le Rosey या शाळेत विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल बॅकलॉरिएट आणि फ्रेंच बॅकलोरिएट हे अभ्यासक्रम असतात. याचसोबत अॅडव्हान्स क्लासरुम, भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट यासारख्या सुविधा मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी मदत होते.
ही शाळा उन्हाळ्यात रोले या शहरात असते तर हिवाळ्यात गस्टाडमध्ये असते. या शाळेमध्ये स्नोबोर्डिंग, स्कीइंग आणि आइस हॉकीसारखे खेळ खेलले जातात. या शाळेची फी खूप जास्त आहे. परंतु या शाळेच्या सुविधादेखील तेवढ्याच लक्झरी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.