Biggest Landowner India : सरकारनंतर भारतात सर्वाधिक जमीन कुणाकडे? तब्बल १७ कोटी एकर जागा आहे नावावर

Biggest Landowner of India: भारतात सर्वाधिक जमीन कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Biggest Landowner
Biggest LandownerSaam tv
Published On
Summary

भारतात सर्वाधिक जमीन कोणाच्या नावावर?

भारतात सर्वाधिक जमीन केंद्र सरकारच्या मालकीची

कॅथलिक चर्च ऑफ इंडियाकडे ७ कोटी हेक्टर जमीन

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील सर्वाधिक लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती करण्यासाठी शेतजमीन लागते. त्यामुळे जमीन ही खूप महत्त्वाची संपत्ती मानली जाते. फक्त शेतजमीन नव्हे तर इतर व्यवसायांसाठीही जमीन लागते. शेती, गृहनिर्माण, उद्योग, शिक्षण यासाठी जमीन आवश्यक असते.

Biggest Landowner
Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

जमीनीवरच आपण शेतीचे उत्पन्न घेऊ शकते. याच जमिनीवर आपण घरे, इमारती बांधू शकतो. जमिनीमुळे अर्थव्यवस्था, राजकारण आणि इतर समाजांना आकार मिळतो. त्यामुळे जमिनीचे खूप महत्त्वच आहे.दरम्यान, भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे आहे हे तुम्हाला माहितीये का? भारतासारख्या मोठ्या देशात अंदाजे ३.२९ दशलक्ष जमीन आहे. ही जमीन लोकांच्या उपजीविकेसाठी आणि विकासासाठी काम करु शकते.

भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे आहे? (Indias Biggest Landowner)

भारतातील सर्वाधिक जमीन ही सरकारच्या मालकीची आहे. ज्यामुळे भारत सरकार हे मोठे जमीनधारक आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत केंद्र सरकारडे जवळपास १५,५३१ चौरस किलोमीटर जमीन आहे. ही जमीन ११६ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि ५१ केंद्रीय मंत्रालयांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे सर्वाधिक जमीन असल्याचे समोर आले आहे.

Biggest Landowner
Maharashtra Tourism : सप्टेंबरमध्ये भेट द्यावीत अशी महाराष्ट्रातील निसर्गरम्य Top 6 पर्यटनस्थळे

यानंतर देशातील दुसऱ्या क्रमाकांवर सर्वाधिक जमीन कॅथलिक चर्च ऑफ इंडियाकडे आहे. कॅथलिक चर्च ऑफ इंडियाकडे संपूर्ण भारतात ७ कोटी हेक्टर म्हणजे १७.२९ कोटी एकर जमीन आहे. या जमिनीची किंमत १ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये चर्च, शाळा बांधल्या आहेत.

भारत सरकारकडे एकूण किती जमीन? (How Much Land Own By Central Government)

भारतातील मंत्रालयांमधील सर्वाधिक जमीन रेल्वे मंत्रालयाकडे आहे. ही जमीन २९२६.६ चौरस किलोमीटर आहे. यानंतर संरक्षण मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाकडे प्रत्येकी २५८०.९२ चौरस किलोमीटर जमीन आहे. ऊर्जा मंत्रालयाकडे १८०६.६९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली जमीन आहे.

Biggest Landowner
Maharashtra Government: रस्त्यांना मिळणार विशिष्ट नंबर, रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com