IMD ISSUES FIVE-DAY HEAVY RAIN ALERT: MAHARASHTRA AMONG 21 STATES BRACING FOR INTENSE MONSOON saam tv
देश विदेश

Monsoon Rain: 80 किमी वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह २१ राज्यात पुढील ५ दिवस 'जोर'धार पाऊस, IMDचा अलर्ट

Monsoon Rain Update: भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत २१ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. ताशी ८० किमी वेगाने वाहणारे वारे, विजांच्या कडकडाटासह वादळ येईल. 'रेड अलर्ट' यामुळे प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

  • पुढील पाच दिवस देशभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

  • काही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ताशी ७५ ते ८० किमी वेगाने वारे वाहू शकतात.

मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून देशभरात जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई पावसाच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, ७ जुलै रोजी आणि पुढील पाच दिवस मान्सूनचा पाऊस सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज देशातील २१ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. अति मुसळधार पावसासाठी चार राज्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७५ ते ८० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि त्यासोबतच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण झारखंडचा अंतर्गत भाग आणि त्याला लागून असलेल्या उत्तर ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण झाल्यामुळे मान्सून सक्रिय राहणार आहे.

पुढील ५ दिवसांसाठी पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गुजरात आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील विविध भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

आज उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पावसाची शक्यता

वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, आज उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये - देहरादून, पौरी, हरिद्वार, उधम सिंग नगर, नैनीताल आणि बागेश्वर - मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, चंदीगड आणि पंजाबमधील पठाणकोट, होशियारपूर, रूपनगर, मोहाली, फिरोजपूर, फाजिल्का, फरीदकोट, श्री मुक्तसर साहिब, भटिंडा व मानसा या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.

हरियाणा आणि बिहारमध्ये आज पावसाचा इशारा

आज हरियाणातील सात जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पंचकुला, अंबाला, यमुनानगर, महेंद्रगड, रेवाडी, नूह आणि पलवल यांचा समावेश आहे. तसेच आज राजस्थानमधील सात जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये ७ जुलै ते १२ जुलै या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. यासह आज मध्य प्रदेशातील ३१ जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT