Monsoon  
देश विदेश

Monsoon: आनंदी आनंद गडे! मान्सून अंदमानमध्ये दाखल

Monsoon News: जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. निकोबार बेटावर गेल्या २४ तासात चांगला पाऊस झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे : आज मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान समुद्र तसेच बंगालच्या खाडीमध्येही मान्सून आज दाखल होणार आहे. भारताचे मुख्य भूमी म्हणजेच ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. निकोबार बेटावर गेल्या २४ तासात चांगला पाऊस झालाय.

Monsoon News

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरू होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी १० दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मे महिना सुरू होताच अनेकांच्या डोळे नैऋत्य मान्सूनकडे लागत असतात. यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं होतं.

आयएमडीने १९ मे ला मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मान्सून अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झालाय. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झालाय. यासंदर्भात ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखीच वाढणार असून येत्या शुक्रवारपर्यंत अनेक भागात तुफान पाऊस कोसळणार असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आलाय. हवामान खात्याने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला येत्या २४ मेपर्यंत येलो अलर्ट जारी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT