MONSOON 2026 UPDATE: KERALA LIKELY TO RECEIVE MONSOON BY JUNE 4, MAHARASHTRA AWAITS RAINS AFTER JUNE 10 Saam Tv
देश विदेश

Monsoon Update : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्रात कधी आणि कुठे? जाणून घ्या A to Z माहिती

Kerala Monsoon Update News : भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १० जूननंतर मान्सून आगमनाचा अंदाज असून उशिरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Alisha Khedekar

  • ४ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल

  • महाराष्ट्रात १० जूननंतर मान्सूनचे आगमन

  • पेरणीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता

  • हवामानातील बदलामुळे मान्सूनच्या आगेकूच होण्यास विलंब

Kerala Monsoon Update वाढत्या उष्णतेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होत असून याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांना बसला आहे. महाराष्ट्रात १० जून नंतर मान्सूनचे (Maharashtra Monsoon After 10th June) आगमन होणार असून बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. उशिराने दाखल होणाऱ्या या मान्सूनमुळे शेती संबंधित कामे रखडली आहेत.

दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनची एंट्री (Kerala Monsoon Entry) होते. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा सुरुवातीला २६ मेच्या आसपास मान्सून दाखल होईल होणार होता. हवामानातील बदल आणि काही प्रतिकूल घटकांमुळे हा अंदाज चुकीचा ठरला. आता हवामान विभागाने २ ते ४ जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोचण्याची शक्यता वर्तवली आहे.

शनिवारी मॉन्सूनने लक्षद्वीप बेटांच्या आणखी काही भागासह, अरबी समुद्र, कोमोरिन भाग, तसेच बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे. काल म्हणजेच सोमवारी मॉन्सून जैसे थेच होता. पुढील दोन दिवसांत केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागासह अरबी समुद्र, लक्षद्विप बेट आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची (Maharashtra Farmer) चिंता वाढली आहे. भात, सोयाबीन, मका आणि कापूस यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी वेळेवर पाऊस आवश्यक असतो. मान्सूनला अधिक उशिर झाल्यास शेतकऱ्यांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशाच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा मान्सून आता भारताच्या उंबरठ्यावर पोचला असून ४ जूनकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: वेगवेगळे तेले, वेगवेगळे फायदे! बेंबीत कोणते तेल कधी टाकल्याने शरिराला होतो फायदे ?

'मराठी मिडियम' मालिकेतली अभिनेत्री आहे प्रसिद्ध इन्फ्ल्यूएन्सर! इन्स्टाग्रामवर आहेत मिलियन फॉलोअर्स

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ५ मिनिटांत, काय आहे सरकारचा मास्टरप्लान?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

SCROLL FOR NEXT