Monsoon 2023 SaamTv
देश विदेश

Monsoon Update : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थानमधून सुरुवात, हवामान विभागाची माहिती

Rain Update : मान्सूनच्या आगमनाला जसा उशीर झाला त्याचप्रमाणे त्याच्या परतीचा प्रवासही यंदा लांबला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News :

राज्यात काही भागात पावसाने सप्टेंबरच्या मध्यवधीत पुनरागमन केले. अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. मात्र आता मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्‍चिम राजस्थानमधून सुरूवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मान्सूनच्या आगमनाला जसा उशीर झाला त्याचप्रमाणे त्याच्या परतीचा प्रवासही यंदा लांबला आहे. (Latest News)

सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सून माघारी फिरत आहे. महाराष्ट्रात साधारणपणे ५ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यामुळे मॉन्सून आपल्या नियोजित वेळेत राज्यातून माघे फिरेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानच्या काही भागांतून 25 सप्टेंबर रोजी मान्सून परतला आहे. उत्तर अंदमान समुद्रावर आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराला लागून 30 सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो हळूहळू तीव्र होण्याच्या शक्यतेसह पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

यावर्षी मॉन्सूनचं आगमन देखील लांबलं होतं. केरळमध्येच मान्सून ८ जूनला दाखल झाला होता. त्यानंतर तळ कोकणात ११ जून रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT