Manasvi Choudhary
सध्या नो मेकअप लूक प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहे. नो मेकअप लूकमध्ये तुम्ही मेकअप केल्यानंतर मेकअप केला आहे असं वाटत नाही.
नो मेकअप लूकमध्ये चेहरा स्वच्छ, फ्रेश आणि चमकदार दिसतो. असा लूक करण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.
अंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर स्वच्छ पुसून मॉइश्चरायझर लावणे महत्वाचे आहे.
चेहरा जास्त तेलकट असेल तर मॅटिफायिंग प्राइमर वापरा, ज्यामुळे त्वचा गुळगुळीत दिसेल.
चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याऐवजी कन्सीलर लावा यामुळे त्वचेवर मिसळून जाईल.
पावडर ऐवजी चीक टिंट वापरा. हे गालांवर लावल्यामुळे नैसर्गिक लालपणा येतो उरलेले थोडेसे टिंट नाकावर लावा यामुळे 'सन-किस्ड नॅचरल लूक मिळतो.
आयब्रो पेन्सिलने भुवया फक्त वरच्या दिशेला विंचरा. यामुळे चेहरा अधिक लिफ्टेड आणि फ्रेश दिसतो.
भडक लिपस्टिक टाळा. त्याऐवजी आपल्या ओठांच्या रंगाशी मिळतीजुळती न्यूड लिपस्टिक किंवा फक्त टिंटेड लिप बाम लावा.