Sakshi Sunil Jadhav
नवीन वर्ष सुरू होताच अनेकजण वजन कमी करण्याचा संकल्प करतात. मात्र हेवी डाएट आणि जिमची शिस्त रोज फॉलो करणं खूप कठीण होत असतं.
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आवडत्या पदार्थांवर पूर्णपणे टाळण्यापेक्षा स्मार्ट Diet Swaps जास्त फायदेशीर ठरतात.
कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते. याऐवजी नारळपाणी, लिंबूपाणी किंवा थंड ताकाचे सेवन करा. याने शरीर हायड्रेट राहतं.
फळांचा ज्यूस काढल्यावर त्यातले फायबर्स कमी होतात. उलट सगळी फळं चावून खाल्ल्याने पोट भरतं आणि पोषण पूर्ण मिळतात.
संध्याकाळच्या भुकेसाठी तळलेले चिप्स टाळा. भाजलेले मखाणे किंवा पॉपकॉर्न हा कमी कॅलरीचा उत्तम पर्याय आहे.
मेयोनीजमध्ये फॅट जास्त असते. सँडविच किंवा रोलसाठी पुदिन्याची चटणी, हमस किंवा घट्ट दही वापरल्यास चवही टिकते आणि आरोग्यही.
गोड खाण्याची इच्छा होत असेल तर जास्त साखर असलेल्या मिल्क चॉकलेटऐवजी थोडं डार्क चॉकलेट खा. यात अँटीऑक्सिडंट्स असतात.
मैद्याचे ब्रेड लवकर पचतात आणि भूक लवकर लागते. मल्टीग्रेन किंवा होल व्हीट ब्रेडमध्ये फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. या छोट्या संकल्पांनी वर्षभरात तुमच्यात खूप चांगले बदल होतील.