Monsoon Update Saam tv
देश विदेश

Monsoon 2023 Update: 17 जूननंतर मान्सूनचा जोर वाढणार, मुंबई- पुण्यात कधी पोहचणार?

Priya More

Monsoon Latest Update: बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) आणि त्यापाठोपाठ तळकोकणात दाखल झाला खरा. पण आता मान्सूनचा (Monsoon 2023) वेग मंदावला आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला उशिर होणार आहे. बिपरजॉय (Biparjoy Cyclone) या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्यांमध्ये जास्त जोर नसल्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे मान्सून इतर भागांमध्ये उशिराने दाखल होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतरच मान्सून पुणे आणि मुंबईमध्ये दाखल होईल. 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल. मराठवाडा आणि विदर्भाला मात्र पावसाची वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सून दाखल व्हायला उशिर झाला. केरळमध्ये 8 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यापाठोपाठ 12 जूनला मान्सून कर्नाटक, तामिळनाडू आणि तळकोकणात दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत नागरिकांना आनंद झाला. पण आता मान्सूनचा पुढचा प्रवास लांबल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. कारण मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाची तयारी केली होती. पण आता मान्सून पुढे उशिराने येणार असल्यामुळे ते चिंतेत आले आहेत.

सध्या अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ तीव्र होत चालले आहे. सध्या हे चक्रीवादळ 14 जूनला म्हणजे उद्या गुजरातच्या किनारपट्टीवरवर धडकणार आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर परिसरात 15 जूनला या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हळूहळू पुढे सरकत हे चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छमार्गे पाकिस्तानकडे जाणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई, गुजरात आणि केरळमधील समुद्र किनारा परिसरात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोकणात समुद्र खवळलेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक आणि नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत अनेक भागांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे 5 जूनपर्यंत लांब पल्ल्याच्या 67 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातकडे जाणाऱ्या या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT