Nashik Education Officer Sunita Dhangar News: नाशिमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना जामीन मंजूर झाला आहे. १ लाखाच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने सुनीता यांना सशर्त जामीन दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या परवानगी शिवाय शहराबाहेर जाता येणार नाही, असं देखील त्यांना सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
सुनीता धनगर यांनी बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतली होती. ही लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.
त्यांच्या घराच्या तपासणीत ८५ लाख रुपये रोख, ३२ तोळे सोन्याचे दागिने, सदनिका तसेच मोकळ्या भूखंडाचे कागदपत्रे आढळून आले होते. त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियामधील चार वेगवेगळ्या खात्यात ३० लाख, १६ हजार ६२० रुपये आढळून आले होते.
घरात इतक्या मोठ्या प्रमाणात घबाड (Money Fraud) सापडल्याने सुनीता धनगर यांचे निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा कोठडीत मुक्कामही वाढवण्यात आला होता. धनगर यांना अटक होताच त्यांच्या कार्यपध्दतीचे किस्से शिक्षकांकडून बाहेर पडू लागले होते.
धनगर यांची काम करण्याची (Nashik News) पध्दत विचित्र होती. त्या कायम कर्मचाऱ्यांशी उर्मट वागत. स्वत:कडून चुका झाल्या की त्या कर्मचाऱ्यांवर ढकलत असत. कोणी एखाद्याचे काम बरोबर नाही, अशी तक्रार केल्यास त्या लेखी देण्यास सांगत असत.
तक्रार प्राप्त झाली की समोरच्या व्यक्तीवर दबाव आणून त्याच्याकडून पैसे उकळायचे, ही धनगर यांची कार्यशैली राहिली आहे, असं शिक्षकांकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, धनगर यांनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला होता. यावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.