Monkeypox Virus  Saam TV
देश विदेश

Monkeypox Virus : सावधान! मंकीपॉक्स रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; वाचा लक्षणे आणि उपाय

Monkeypox Virus Spreading : गेल्या वर्षी देखील मंकीपॉक्स आजाराने विविध देशांत धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आफ्रिकेत या आजाराचे विषाणू पसरत असल्याचे दिसत आहे.

Ruchika Jadhav

मंकीपॉक्स या विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत चालला आहे. आफ्रिकेत या विषाणूचा झपाट्याने संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी देखील मंकीपॉक्स आजाराने विविध देशांत धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आफ्रिकेत या आजाराचे विषाणू पसरत असल्याचे दिसत आहे.

मंकीपॉक्स आजार संसर्गजन्य आहे. आफ्रिकेत याचे रुग्ण आता झपाट्याने वाढण्यास सुरुवात झालीये. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात चांदीपुरा आणि झिका असे जुने आजार पुन्हा संक्रमीत झालेत. तसेच काही ठिकाणी कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती देखील आढळल्या आहेत. अशात आता मंकीपॉक्स व्हायरसने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे आणि उपाय काय आहेत याची माहिती जाणून घेऊ.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे

महिन्याभरापासूनच मंकीपॉक्स आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. यामध्ये सुरुवातीला व्यक्तीच्या शरीरावर बारीक पुरळ येतात. त्यानंतर ताप आणि डोके दुखी सुरू होते. अंग देखील दुखू लागतं ही सर्व साधारण लक्षणे आहेत. मात्र पुढे महिन्याभरानंतर हा आजार बळावतो आणि जास्त वाढतो.

पुरळ सारखे शरीरावर बारीक दाणे येतात. सुरुवातील हे पुरळ चेहरा, हाथ आणि पायांवर येतात. तसेच नंतर हळूहळू संपूर्ण शरीरभर पुरळ पसरत राहतात. यामुळे त्वचेवर सतत खाज येते आणि जळजळ होत राहते. काही दिवसांतच हे पुरळ मोठे होतात आणि त्यात पाणी तयार होतं.

स्वत:ला कसं वाचवाल?

मंकीपॉक्स सारख्या घातक आजारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी हा आजार झालेल्या व्यक्ती तसेच एखाद्या प्राण्यापासून कायम दूर राहा.

घराबाहेर पडताना बॅक्टेरीआचा आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून चेहऱ्याला मास्क लावा. मास्क लावल्याने तुम्हाला हा आजार होणार नाही.

मंकीपॉक्स आजारापासून दूर राहण्यासाठी आपले हाथ, पाय कायम स्वच्छ ठेवा. बाहेरून आल्यावर लगेचच हाथ आणि पाय स्वच्छ धुवून घ्या.

मंकीपॉक्सची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांना याबाबत लगेचच विचारा आणि त्यावर उपचार घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT