Nigerian monkeypox patient found in delhi
Nigerian monkeypox patient found in delhisaam tv

Breaking : दिल्लीत ९ जणांना मंकीपॉक्स, नायजेरियातील रूग्ण आढळल्याने खळबळ

देशात मंकीपॉक्स रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
Published on

मुंबई : एकीकडे देशात कोरोनाची लाट ओसरत असतानाच आता मंकीपॉक्सने नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशात मंकीपॉक्स रूग्णांची (monkeypox patient) संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा नवा रुग्ण पुन्हा आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिल्लीत मंकीपॉक्स रूग्णांची संख्या ९ झाली असून देशातील रूग्णसंख्या १४ वर पोहोचली आहे.दिल्लीत सापडलेला रूग्ण नायजेरिया देशातील नागरिक आहे. (Nigerian monkeypox patient found in delhi)

Nigerian monkeypox patient found in delhi
एकमेकांची पापे कशाला धुता ? त्यापेक्षा...; मनसे आमदार राजू पाटलांचा शिंदे गटावर निशाणा

मंकीपॉक्स व्हायरस किती धोकादायक?

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस आहे. म्हणजेच हा विषाणू प्राण्यांकडून माणसात पसरतो किंवा प्राण्यांकडून माणसात येतो. त्याची लक्षणे कमी-अधिक प्रमाणात चेचक सारखी असतात. मंकीपॉक्सची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, पुरळ आणि सुजलेल्या लसिका ग्रंथी ज्यामुळे विविध गुंतागुंत होऊ शकतात.

Nigerian monkeypox patient found in delhi
कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 'या' कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह सहाय्य मिळणार; सरकारची मान्यता

एनआयव्हीच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रज्ञा यादव यांच्या मते, मंकीपॉक्सच्या अलीकडील प्रकरणांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु ती काँगो प्रकारापेक्षा कमी गंभीर आहेत. सध्याचा मंकीपॉक्स विषाणू हा पश्चिम आफ्रिकन जातीचा आहे. भारतातील मंकीपॉक्सची प्रकरणांमध्ये पश्चिम आफ्रिकेतील स्ट्रेन आहे जो कमी घातक आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com