Monkeypox Saam Tv
देश विदेश

युरोपमध्ये वाढतोय मंकीपॉक्स! WHO चाही इशारा, जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

जगभरात मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. युरोपमध्ये (Europe) मंकीपॉक्सचे 100 रुग्ण आढळून आले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. युरोपमध्ये (Europe) मंकीपॉक्सचे 100 रुग्ण आढळून आले आहेत. याची गांभीर्याने दाखल घेत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबतीत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या मंकीपॉक्स युरोपातील एकूण 9 देशांमध्ये आढळून आला आहे. बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि यूके यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत चालले आहेत.

अमेरिकेत या वर्षी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. याआधी युरोपातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरण केसेस समोर आले आहेत. यापैकी 7 यूकेमध्ये नोंदवले गेले आहेत तर काही केसेस पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये देखील नोंदवली गेली आहेत.

मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा विषाणू आहे, ज्याची लक्षणे स्मॉल पॉक्ससारखीच असतात. हा एक अतिशय गंभीर प्रकारचा विषाणू आहे.

मंकीपॉक्स विषाणू हा डबल-स्ट्रॅंडेड DNA विषाणू आहे. अनेक प्राण्यांच्या प्रजाती मिळून मंकीपॉक्स तयार होतो. या प्राण्यांमध्ये रोप गिलहरी, वृक्ष गिलहरी, उंदीर, डर्मिस, नॉन-ह्युमन प्राइमेट्स आणि इतर प्रजातींचा समावेश आहे. मानवांमध्ये पहिल्यांदा 1970 मध्ये मंकीपॉक्स आढळला होता. कॉंगो प्रजासत्ताकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाला मंकीपॉक्सची लागण झाली होती.

अशा प्रकारे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग होतो;
मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव किंवा फर यांना स्पर्श करून संक्रमित होऊ शकतो. हे उंदीर, ससे यांसारख्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे पसरते असे मानले जाते. हा विषाणू माणसांमध्ये खूप वेगाने पसरतो. तुम्ही संक्रमित व्यक्तीचे कपडे वापरल्यास तुम्हाला मंकीपॉक्स होऊ शकतो. हा विषाणू शिंक आणि खोकल्यामुळे देखील पसरू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

  • मंकीपॉक्सची लागण झाल्यापासून पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.

  • मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक यांसारखा दिसतो.

  • ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.

  • शरीरावर पिंपल्स दिसतात.

  • हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसण्यास सुरुवात होते.

  • हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे यांना प्रभावित करते.

मंकीपॉक्सचा उपचार

  • मंकीपॉक्सचा संशय असल्यास, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य नमुना गोळा करावा.

  • त्यानंतर नमुना सुरक्षितपणे प्रयोगशाळेत पोहोचला पाहिजे.

  • मंकीपॉक्सची पुष्टी नमुन्याचा प्रकार आणि गुणवत्ता आणि प्रयोगशाळा चाचणीच्या प्रकारावर अवलंबून असते.

  • मंकीपॉक्स नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT