Constant Stomach Pain : सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

abdominal pain causes : सतत पोटात दुखत असल्यास हे फक्त अपचन नाही. अशा वेळी अल्सर, अॅसिडिटी, आयबीएस, किंवा इतर गंभीर आजारांची शक्यता असते. योग्य निदान आणि उपचार आवश्यक आहेत.
Don’t ignore persistent stomach pain
Don’t ignore persistent stomach painFreepik
Published On

आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजारांचा संबंध थेट आपल्या पोटोशी असतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला खाण्या-पिण्याकडे लक्ष देता येत नाही. खाण्याच्या अनिश्चित वेळा, सतत बाहेरचे खाणे यामुळे पोट दुखी, जुलाब असे पोटाच्या संबंधीचे आजार उद्भवतात. पण या समस्या नेहमीच जाणवत असतील तर त्यांना दुर्लक्षित करू नका. सतत पोट दुखत असल्यास हे एखाद्या गंभीर आजाराचे कारण असू शकते.

Don’t ignore persistent stomach pain
Early stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर असल्यास केवळ सकाळच्याच वेळी शरीरात होतात हे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

पोट दुखीची अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला पोटात मरगळ, गॅस होत असेल आणि सतत शौचास जावे लागत असेल, तर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होण्याची शक्यता आहे. तसेच आंबट ढेकर येत असतील, छातीत जळजळ हे ऍसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी या आजाराचे लक्षण आहे. सतत पोट दुखीमुळे जास्त प्रमाणात पेन किलर्स घेत असाल तर पोटाच्या आतील भागाला सुज येऊन अल्सर होऊ शकतो.

ग्लूटेनयुक्त पदार्थ जसे की गहू, राई, रवा, ओट्स, ब्रेड, पास्ता, पिज्जा, केक, सॉस, काही मसाले खाल्ल्यामुळे तुम्हाला अतिसार, थकवा आणि पोटदुखी होत असेल तर हे सेलिाआक या रोगाचे लक्षण असू शकते. पोटातील लहान आतड्यांमध्ये संसर्ग होऊन पोटाच्या डाव्या बाजूला दुखत असेल तर तुम्हाला डायव्हर्टिकुलायटिस हा आजार होऊ शकतो. दिर्घकाळापर्यंत अतिसार आणि पोट दुखी होत असेल तर हे आतड्यांच्या आजाराचे कारण असू शकते.

Don’t ignore persistent stomach pain
Stomach Gas Problem: तुमच्या पोटातही गॅस होतो का? कारणे वाचा आणि त्वरित आराम मिळवण्याचे प्रभावी उपाय

शिवाय चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत असल्यास हे पित्ताशयाच्या खड्यांचे कारण असू शकते. पाठीपासून खालच्या कंबरेपर्यंत तीव्र वेदना होत असतील तर हे किडनी स्टोनमुळे होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा, धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करा, सतत पेन किलर्स घेणं टाळा. वारंवार पोट दुखत असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Don’t ignore persistent stomach pain
Symptoms of Stomach Ulcer : पोटात गाठ झाल्यावर सुरुवातीला दिसतात हे 4 मोठे बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com