ED seizes cash and gold during raid at Karnataka Congress MLA Satish Sail’s residence Saam TV News Marathi
देश विदेश

ED Raid : काँग्रेस आमदाराच्या घरी ईडीची छापेमारी, कोट्यवधीचे घबाड मिळालं, ६.७ किलो सोनं जप्त

ED raid on Congress MLA Satish Sail in Karnataka : ईडीने कर्नाटकमधील काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. ईडीने १.४१ कोटींची रोख रक्कम आणि ६.७ किलो सोनं व दागिने जप्त केले. मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणात हा छापा टाकण्यात आला.

Namdeo Kumbhar

  • कर्नाटकमधील काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्या घरी ईडीची मोठी कारवाई.

  • छाप्यात १.४१ कोटी रोख आणि ६.७ किलो सोनं जप्त.

  • मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणात छापा.

  • गोवा, मुंबई, दिल्ली आणि कारवार येथे एकाचवेळी ईडीची छापेमारी.

ED Raid in Karnataka : कर्नाटकमधील काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. सैल यांच्या घरातून ईडीने १.४१ कोटींची रोख कॅश जप्त केली आहे. तर कुटुंबाच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलोचे सोनं आणि दागिणे जप्त केले आहे. सतीश सैल हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विधानसभा जागेवर आमदार आहेत. १५ ऑगस्ट रोजी सतीश कृष्ण सैल यांच्या घरी ईडीने छापा मारला होता. मनी लँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस आमदाराच्या घरी छापा मारला. (6.7 kg gold seized from MLA Satish Sail residence)

५९ वर्षाचे आमदार सैल यांच्याशी कथितरित्या संबंधित असलेल्या एका कंपनीद्वारे लोहखनिजाच्या कथित बेकायदेशीर निर्यातीशी संबंधित ईडीने छापा मारला. सैल हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या, ईडीच्या आरोपांवर सैल यांची अद्याप कोणताही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान, ईडीने छापेमारीत कागदपत्रे, ईमेल, रेकॉर्ड इत्यादी स्वरूपात काही गुन्हा सिद्ध करणारे पुरावेही जप्त केले आहेत. (Money laundering PMLA case Karnataka MLA raid)

ईडीने या प्रकरणात कारवार, गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे छापे टाकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) च्या तरतुदींनुसार ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यात आशापुरा माइनकेम, श्री लाल महल, स्वास्तिक स्टील्स (होसपेट), आयएलसी इंडस्ट्रीज, श्री लक्ष्मी वेंकटेश्वर मिनरल्स यांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत ईडीकडून अधिकृत माहिती देण्यात आली. ईडीने आपल्या निवेदनात म्हटले की, खासदार आणि आमदारांच्या विशेष न्यायालयाने श्री मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने इतरांशी संगनमत करून लोहखनिज पावडरच्या बेकायदेशीर निर्यातीसाठी सैल यांच्यासह सर्व आरोपींना दोषी ठरवले होते.

मल्लिकार्जुन शिपिंग ही सैल यांची कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आमदाराला दिलेली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा निलंबित करण्याचा आदेश दिला होता. एजन्सीने आरोप केला आहे की, ईडीच्या तपासात असे आढळले की, सैल यांनी इतर व्यावसायिक संस्था आणि बेलेकेरी बंदरातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून 19 एप्रिल 2010 ते 10 जून 2010 या कालावधीत सुमारे 1.25 लाख मेट्रिक टन लोहखनिज पावडरची बेकायदेशीर निर्यात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT