Mohammed Siraj Exclusion Row: Congress Vs Bjp Political War Over Cricket saam tv
देश विदेश

टीम इंडियातून सिराज 'आऊट'! क्रिकेटच्या मैदानात राजकारणाची एण्ट्री; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

Mohammed Siraj Selection Row: भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीतून मोहम्मद सिराजला वगळल्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी, "त्याचे नाव सिराज आहे, अशी टिप्पणी केलीय. दुसरीकडे काँग्रेस क्रिकेटच्या खेळातही 'व्होट-बँकचे राजकारण' करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी सिराजच्या नावाचा उल्लेख करत टिप्पणी केली.

  • सिराजला संघाबाहेर ठेवल्याच्या निर्णयात भेदभाव झाल्याचा आरोप

  • क्रिकेटमध्येही व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप भाजपनं केला.

क्रिकेट हा प्रत्येक भारतीयांच्या आवडीचा खेळ, संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करत असतो. खेळात विजय मिळवून देशाची मान उंचावण्यासाठी प्रत्यके खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. संघातील प्रत्येक खेळाडू खेळाडूचं असतो, त्यात जात, धर्म पाहिला जात नाही. परंतु मात्र क्रिकेटच्या खेळात राजकारणाची एंट्री झालीय. भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला वगळल्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय.

काँग्रेस पक्षाने या वेगवान गोलंदाजाला संघातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यात भेदभाव केल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे काँग्रेस क्रिकेटच्या क्षेत्रातही 'व्होट-बँकचे राजकारण' करण्याचा आणि संघ निवडीला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी संघातून सिराजला वगळण्याबाबत प्रश्न उपस्थित करत, त्याचा संबंध थेट धर्माशी जोडलाय. चांगली कामगिरी करूनही सिराजला संघात स्थान दिले जात नाहीये."त्याचे नाव सिराज आहे, हेच कारण संघातून बाहेर ठेवण्यासाठी पुरेसे नाही का? जर तो चांगली कामगिरी करत असूनही त्याची निवड होत नसेल, तर दुसरे काय कारण असू शकते? नक्कीच हेच एकमेव कारण असावे. ज्यामुळे त्याच्याशी भेदभाव केला जात असावा, यासह दुसरे कोणतेही कारण असूच शकत नाही, असं इमरान मसूद म्हणालेत.

इमरान मसूद यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झालाय. काँग्रेस खासदारच्या विधानावर भाजपनेही तिखट प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेस क्रिकेट संघाच्या निवडीसारख्या विषयालाही जातीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. "काँग्रेसला लाज वाटली पाहिजे! आता काँग्रेस क्रिकेट संघाच्या निवडीच्या बाबतीतही 'व्होट-बँक पॉलिटिक्स' करत असा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांना काँग्रेसवर टीका करताना केलाय.

काँग्रेसने दावा केलाय की, सिराज हा मुस्लीम आहे म्हणून त्याला संघातून वगळण्यात आले. परंतु ऑलराउंडर रवींद्र जडेजालाही तर संघातून बाहेर ठेवण्यात आलंय. प्रत्येक क्रिकेटर भारताचं प्रतिनिधित्व करणारी जर्सी परिधान करत असतो. व्होट बँक आणि धार्मिक राजकारणासाठी भारतीय संघाला विभाजित करणं बंद करावं असंही भंडारी म्हणालेत.

सिराजला संघातून बाहेर ठेवण्यावरून वाद का?

गेल्या काही वर्षांत मोहम्मद सिराजनं भारतीय संघात वेगवान गोलंदाजी करतो, त्याने संघात शानदार कामगिरी केलीय. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे हा चर्चेचा विषय ठरलाय. सुमारे १५ महिन्यांपूर्वी लंडनमधील 'द ओव्हल' मैदानावर सिराजने एक उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ मालिकेच्या शेवटच्या दिवशी सिराजने दमदार कामिगरी करत भारताने ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती.

या कामगिरीनंतर, सिराज भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारा खेळाडू म्हणून समोर येऊ शकेल, असे मानले जात होते. त्याचवेळी जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरही विशेष लक्ष दिले जात होते, मात्र गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे वेलिंग्टनमधील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानली जात होती. तरीही संघ व्यवस्थापनाने अशा संघाची निवड केली, ज्यामध्ये इतर चार वेगवान गोलंदाजांचा समावेश होता, पण त्यात सिराज नव्हता.

NASA Research : चंद्रावरही होणार बटाट्याची शेती, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश, हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Maharashtra News Live Update: काँग्रेस लागली लोकभेच्या तयारीला

सतत तक्रार करणाऱ्यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? मानसशास्त्र काय सांगतं?

किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 5 वस्तू, आरोग्य, सुख- समृद्धीवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT