PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi Speech: संसदेत मोदींनी वाचला 'आज काँग्रेस नसती तर..." चा पाढा!

वृत्तसंस्था

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिलं. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. यावेळी पीएम मोदींनी कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात कसे काम झाले ते सांगितले. यासोबतच त्यांनी रोजगारापासून ते महागाईपर्यंतच्या मुद्द्यावर भाष्य केले. तसेच आज काँग्रेस नसती तर स्थिती काय असती हे देखील खोचक शब्दात मोदींनी सांगितले आहे.

मोदी म्हणाले काँग्रेस नसती तर...

पंतप्रधान मोदींनी संसदेत सांगितले की, महात्मा गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झाले असते. काँग्रेस नसती तर लोकशाही कुटुंबवादापासून मुक्त झाली असती, काँग्रेस नसती तर भारत परकीय वृत्तीऐवजी स्वदेशी संकल्पांच्या मार्गावर चालला असता. काँग्रेस नसती तर देशावर आणीबाणीचा कलंक लागला नसता, भ्रष्टाचाराला अनेक दशके संस्थात्मक स्वरूप आले नसते. पुढे ते म्हणाले, काँग्रेस नसती तर, जातिवाद आणि प्रादेशिकता यांच्यातील दरी इतकी खोलवर गेली नसती, काँग्रेस नसती तर शिखांचे हत्याकांड झाले नसते. वर्षानुवर्षे पंजाब दहशतीच्या आगीत जळला नसता, काश्मीरचे पंडित काश्मीर सोडू शकले नसते, मुलींना तंदूरमध्ये जाळण्याच्या घटना झाल्या नसत्या. देशात जाळपोळीच्या घटना घडल्या नसत्या, सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी देशाला इतकी वर्षे वाट पाहावी लागली नसती.

गोव्यावर काँग्रेसने जुलूम केले;

गोव्याचे उदाहरण देत पीएम मोदींनी काँग्रेसला चांगलेच घेरले. मोदी म्हणाले, "सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती तयार केली असती, तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोव्याला १५ वर्षे गुलामीच्या साखळीत राहावे लागले नसते. नेहरूंना आपल्या प्रतिमेची काळजी होती आणि गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मी सैन्य पाठवणार नाही असे सांगितले होते. काँग्रेसने गोव्यासोबत हा अत्याचार केला आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT