Modi Sarkar On Adani Group
Modi Sarkar On Adani Group SAAM TV
देश विदेश

Modi Sarkar On Adani Group: 'आमचा याच्याशी काहीही संबंध नाही!', आदानी प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया

Chandrakant Jagtap

Gautam Adani News: अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये आदानी समुहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. परंतु आज केंद्र सरकारने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी संसदेतील विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेराव घालत आहेत.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारने आदानी समूहावरील आरोपांच्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

विशेष म्हणजे, अदानी समूहाबाबत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू न झाल्याने सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

सरकारला या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नसून विरोधक त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नसल्याने हा मुद्दा उपस्थित करत असल्याचे जोशी यांनी शुक्रवारी म्हटले. संसदेत पत्रकारांशी बोलताना अदानी समुहाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर जोशी यांनी त्यावर उत्तर देताना या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले.

संसदीय कामकाज मंत्री म्हणाले, सरकारचा या प्रकरणाशी (अदानी समूहाचा मुद्दा) काहीही संबंध नाही. अन्य कोणताही मुद्दा नसल्यामुळे विरोधक सभागृहात व्यत्यय आणत आहेत. अदानी मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सरकारला सतत घेरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Today's Marathi News Live: सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola Crime News : अकोल्यात गुरूच्या नात्याला कलंक; कुस्ती प्रशिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

SCROLL FOR NEXT