One Nation-One Election Saam tv
देश विदेश

One Nation-One Election: मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल, संसदेच्या विशेष अधिवेशनात 'एक देश-एक निवडणूक' विधेयक आणण्याच्या तयारीत?

Special Session of Parliament: लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

Priya More

Modi Government on One Nation-One Election:

केंद्र सरकारने (Modi Government) १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात महत्वाच्या पाच बैठका होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार विशेष अधिवेशनात 'वन नेशन-वन इलेक्शन' (One Nation-One Election) हे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा विचार पुढे आला होता.

यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये लॉ कमिशनने यासंदर्भात राजकीय पक्षांकडून सहा प्रश्नांची उत्तर मागवली होती. सरकारला 'वन नेशन-वन इलेक्शन' हे विधेयक लागू करायचे असले तरी देखील काही राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. 'वन नेशन-वन इलेक्शन'ची सध्या देशात चर्चा सुरू आहे.

'वन नेशन-वन इलेक्शन' अंतर्गत देशात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या व्यतिरिक्त, पंचायत आणि नगरपालिका निवडणुका देखील देशात घेतल्या जातात. पण या निवडणुकांमध्ये 'वन नेशन-वन इलेक्शन' याचा समावेश नाही.

विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे करत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल आणि प्रशासनाचा वेळही वाचेल, असे त्यांचे मत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. त्यामुळे आता येत्या विशेष अधिवेशनामध्ये मोदी सरकार नेमकं काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संविधानाच्या कलम ८५ मध्ये संसदेचे अधिवेशन बोलवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सरकारला संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समिती निर्णय घेते जे राष्ट्रपतींद्वारे औपचारिक केले जाते. ज्याद्वारे खासदारांना अधिवेशनात बोलावले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT