खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

 

Saam Tv

देश विदेश

खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने आश्वासन दिले होते कि, तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढलेली होती. यानंतर केंद्र सरकारने आश्वासन दिले होते कि, तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील.

मोदी सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये प्रती टन ८००० रुपयांची म्हणजेच ११२ डॉलर्सची कपात केल्याने सामान्य लोकांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाचे भाव गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या त्यांच्या महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला होता.

हे देखील पहा -

७० टक्के खाद्यतेल भारताकडून आयात केले जाते. भारतीय बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळत होता. मात्र या निर्णयामुळे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल असा अंदाज आहे.

कपातीची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क जारी केली आहे. त्यानुसार प्रती टनामागे ८६ डॉलर्सनी क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली आहे. तर प्रती टनामागे पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलर्सनी घटवण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT