NDA Government Cabinet Ministers Portfolio eSakal
देश विदेश

Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारचं खातेवाटप: महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांना कोणती खाती मिळाली? जाणून घ्या

NDA Government Cabinet Ministers Portfolio: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा त्याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीत. यात नितीन गडकरी, निर्मला सीतारमन, अमित शहा, राजनाथ सिंह यांना जुन्या मंत्रालयाची जबाबदारी मिळालीय.

Bharat Jadhav

एनडीए सरकारच्या पर्वाला सुरुवात झाली असून आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. मोदी 3.0 च्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. तर इतर पाच खासदारांना कोणत्या खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय ते जाणून घेऊ.

हाती आलेल्या माहितीनुसार, अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा तीच खाती देण्यात आलीत. यात नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्री करण्यात आले असून त्यांच्यासोबत हर्ष मल्होत्रा ​​आणि अजय टमटा यांची रस्ते वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर राजनाथ सिंह यांना पुन्हा एकदा संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे राहणार आहे. नव्याने मंत्री झालेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य खातं देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांची खाती

कॅबिनेट -

नितीन गडकरी - कॅबिनेट

परिवहन आणि रस्ते कॅबिनेट मंत्री

पियूष गोयल - कॅबिनेट

वाणिज्य आणि उद्योग कॅबिनेट मंत्री

-------

राज्यमंत्री -

रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ, सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री

रक्षा खडसे , क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री

------

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

प्रतापराव जाधव, आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT