Rajya Sabha Election 2022 Result : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल, अनिल बोंडे विजयी

भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे.
Rajya Sabha Election 2022 Result Latest Update in Marathi Sanjay Raut, Sanjay Pawar, Anil Bonde, Dhananjay Mahadik, Praful Patel, Imran pratapgarhi, BJP, Mahavikas Aghadi, Congress, NCP, Shivsena
Rajya Sabha Election 2022 Result Latest Update in Marathi Sanjay Raut, Sanjay Pawar, Anil Bonde, Dhananjay Mahadik, Praful Patel, Imran pratapgarhi, BJP, Mahavikas Aghadi, Congress, NCP, ShivsenaSAAM TV

मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीनं परस्परांच्या आमदारांची मते नियमाबाह्य असल्याचा आक्षेप नोंदवल्यानंतर मतमोजणी रखडली होती. निवडणूक आयोगाकडे यासंबंधी तक्रारी गेल्या होत्या. निवडणूक आयोगानं व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर ऑर्डर काढून मतमोजणीला परवानगी दिली. आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणी घेण्यास परवानगी दिली. अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर मध्यरात्री निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली. छाननीनंतर सर्वच्या सर्व २८४ मते वैध ठरवण्यात आली. (Rajya Sabha Election 2022 Result)

महाविकास आघाडीचे संजय राऊत, इम्रान प्रतापगढी आणि प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीचे तीन, भाजपचे दोन उमेदवार विजयी

प्रफ्फुल पटेल - ४३ मते

शिवसेनेचे संजय राऊत - ४२ मते

पीयूष गोयल - ४८ मते

अनिल बोंडे - ४८ मते

प्रतापगढी - ४४ मते

Rajya Sabha Election 2022 Result Latest Update in Marathi Sanjay Raut, Sanjay Pawar, Anil Bonde, Dhananjay Mahadik, Praful Patel, Imran pratapgarhi, BJP, Mahavikas Aghadi, Congress, NCP, Shivsena
RajyaSabha Elections: : मतमोजणीपूर्वीच भाजपच्या अनिल बोंडेंचे विजयाचे बॅनर झळकले

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र मतमोजणीला सुरुवात होऊ शकली नाही. सुरुवातीला भाजपनं (BJP) जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर, तसेच सुहास कांदे यांचे मतदान नियमबाह्य झाल्याचे सांगत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनंही (Mahavikas Aghadi) रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांचे मतदान नियमबाह्य झाल्याचा आक्षेप नोंदवला.

निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्यानंतर व्हिडिओ मागवून घेतला होता. व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर निवडणूक आयोगानं ऑर्डर काढली. त्यानंतर मतमोजणीला परवानगी दिली. निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवून मतमोजणीला सुरुवात करण्यात परवानगी दिली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Rajya Sabha Election 2022 Result Latest Update in Marathi Sanjay Raut, Sanjay Pawar, Anil Bonde, Dhananjay Mahadik, Praful Patel, Imran pratapgarhi, BJP, Mahavikas Aghadi, Congress, NCP, Shivsena
कोल्हापूरच्या २ पैलवानांमध्ये रंगतदार कुस्ती, मला आनंद आहे...: संभाजीराजे

दरम्यान, निवडणूक मतमोजणीला सुरुवात होताच, विधानभवन परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. पोलिसांनी खबरदारी म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विधानभवन परिसरातून बाहेर काढण्यास सुरुवात केली.

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार (पक्षनिहाय)

शिवसेना - संजय राऊत (Sanjay Raut) , संजय पवार

भाजप - पीयूष गोयल, धनंजय महाडीक, अनिल बोंडे

काँग्रेस - इम्रान प्रतापगढी

राष्ट्रवादी काँग्रेस - प्रफुल्ल पटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com