कोणीही बनावट सिम खरेदी केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने संसदेतील राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांतून एक कायदा पारित केलाय. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायदा बनणार आहे. यामुळे जर तुम्ही बनावट कागदपत्रांवर सिम खरेदी केले तर तुम्हाला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. (Latest News)
या विधेयकातील तरतुदीनुसार आता सिम कार्ड (SIM card) देण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना (telecom companies) संबंधित ग्राहकांची बायोमेट्रिक ओळख (Biometric identification) पटवावी लागेल. जर तसं केलं नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन दूरसंचार सेवा (Telecommunication Services) किंवा नेटवर्क ताब्यात घेण्यास किंवा संबंधित कंपनीची सेवा निलंबित करण्याचा अधिकार सरकार घेईल. युद्धसदृश परिस्थितीत आवश्यकता असल्यास सरकार दूरसंचार नेटवर्कवरील संदेश थांबवू शकते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान तुम्ही वापरत असलेले सिम बनावट आहे की नाही हे हे शोधणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला संचार साथी पोर्टलला (Sanchar Saathi Portal) भेट द्यावी लागेल. हे पोर्टल दळणवळण विभागाच्या अंतर्गत काम करते.
बनावट सिम असे करा ब्लॉक
तुम्हाला https://sancharsaathi.gov.in/ पोर्टलवर भेट द्यावी लागेल.
साइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला Know Your Mobile Connections या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल.
यानंतर कॅप्चा कोड आणि OTP टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा तपशील मिळेल.
कोणताही नंबर संशयास्पद वाटल्यास तो ब्लॉक करावा.
बायोमेट्रिक पडताळणी महत्त्वाची
नवीन कायद्यानुसार मोबाइल सिम घेणे कठीण होणार आहे. नवीन कायद्यानुसार जिओ आणि एअरटेल सारख्या सर्व टेलिकॉम कंपन्या बायोमेट्रिक पडताळणीनंतरच मोबाइल सिम कार्ड जारी करतील. टेलिकॉम कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना २ कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. मोबाईल सिमकार्ड विकणाऱ्या दुकानाचा परवाना देखील रद्द करण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.