New Criminal Law : बलात्काराचा गुन्हा केल्यास मृत्युदंड; प्रक्षोभक भाषणासाठी ५ वर्षांची तुरुंगवारी, गृहमंत्र्यांनी मांडली ३ विधेयके

New Criminal Law Amendment Bills : गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत ३ नवीन विधेयके मांडली. सीआरपीसी आणि आयपीसीच्या जागी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ , भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ आणि भारतीय पुरावा विधेयक २०२३ सभागृहात मांडली. या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाल्यास काय बदल होतील ते जाणून घ्या.
Amit Shah
Amit Shah Loksabha ANI
Published On

Home Minister Amit Shah New Criminal Law Amendment Bills: :

गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत तीन नवीन विधेयके मांडली. CrPC सीआरपीसी आणि IPC आयपीसी च्या जागी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ , भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ 3 आणि भारतीय पुरावा विधेयक २०२३ सभागृहात मांडण्यात आलं. त्यांच्या अंमलबजावणीनंतर काय बदल होतील ते जाणून घ्या.(Latest News)

देशातील गुन्हेगारी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत तीन नवीन बिल मांडली. सीआरपीसी आणि आयपीसीच्या जागी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३, भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ आणि भारतीय पुरावा विधेयक २०२३ पटलावर मांडण्यात आले आहेत.

Amit Shah
Parliament winter Session: पाकव्याप्त काश्मीर भारतात असता...; अमित शहांनी लोकसभेत सांगितल्या नेहरूंनी केलेल्या दोन मोठ्या चुका

हे कायदे आणण्यामागे गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे. याच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगली आणि सोपी केली जाईल, असं अमित शाह हे विधेयक मांडताना म्हणाले. दरम्यान या नव्या कायद्यांमुळे न्यायालयाची आणि पोलीस यंत्रणेची कारवाई करण्याची गती वाढणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिवेशनात ही विधेयके मांडली होती. त्यानंतर या विधेयकांना संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहेत. हे कायदे लागू झाले तर काय बदल होतील हे जाणून घेऊ.

जुन्या कायद्यात काय अडचण होती

कायद्यात IPC, CRPC आणि भारतीय पुरावा कायद्याशी असे काही नियम जोडलेले आहेत ज्यामुळे देशातील न्याय प्रक्रियेवर भार वाढवलाय. हा भार कमी करण्यासाठी ही नवीन बिले आणली गेली आहेत. सध्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक न्यायापासून वंचित आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपींवर दोष सिद्ध होत नाही. याचा परिणाम वर्षानुवर्षे खटला चालू राहतो आणि तुरुंगात कैद्याची संख्या वाढत राहते. ही गोष्ट कमी करण्यासाठी हे नवीन कायदे आणण्यात येत आहेत. या विधेयकांना कायद्याचे स्वरूप आल्यास गुंतागुंत कमी होईल, असं सांगितलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नव्या विधेयकात किती आहे बदल

भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ :

त्यात ५३३ कलमांचा समावेश करण्यात आला आहे. हे सीआरपीसीच्या ४७८ कलमांची जागा घेतील.१६० कलमांमध्ये बदल करण्यात आली आहेत. तर ९ नवीन कलमे जोडण्यात आले असून जुन्या ९कलमांना काढून टाकण्यात आले आहेत.

Amit Shah
Parliament Security Breach : 'ही गंभीर बाब आहे, विरोधक राजकारण करत आहेत', अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं

भारतीय न्यायिक संहिता २०२३ :

यात आयपीसीच्या ५११ कलमांची जागा नवीन ३५६ कलमे घेतली. एकूण १७५ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या विधेयकात ८ नवीन कलमे जोडण्यात आली आहेत तर २२ कलमे रद्द करण्यात आली आहेत

भारतीय पुरावा कायदा २०२३ :

जुन्या १६७ कलमांच्या जागी १७० कलम असतील. यासह २३ कलमांमध्ये बदल करण्यात आली आहेत. एका नवीन कलमाचा समावेश करण्यात आलाय. तर कलमांना काढून टाकण्यात आले आहे.

सोप्या भाषेत समजून घ्या १५ मोठे बदल

प्रक्षोभक भाषण केले तर ५ वर्ष तुरुंगवारी

प्रक्षोभक भाषण आणि द्वेषयुक्त भाषणांना गुन्ह्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. जर एखाद्याने असे भाषण केले तर त्याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल. यासोबतच दंडही आकारण्यात येणार आहे. जर कोणत्याही धर्माच्या किंवा वर्गाविरुद्ध प्रक्षोभक भाषण केले असेल तर ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा

नव्या विधेयकानुसार सामूहिक बलात्काराच्या दोषींना २० वर्षे कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. जर अल्पवयीन मुलीवर म्हणजेच १८ वर्षापेक्षा लहान मुलीवर अत्याचार केला असेल तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मॉब लिंचिंगची शिक्षा:

जर ५ किंवा त्याहून अधिक लोकांच्या गटाने जात, समुदाय, भाषा आणि लिंगाच्या आधारावर एखाद्याची हत्या केली तर प्रत्येक दोषीला मृत्युदंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होईल. तसेच या प्रकरणाशी संबंधित दोषीला किमान ७ वर्षांची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.

फरार व्यक्तींचा खटला :

फरार व्यक्ती देशात असो वा नसो, दोन्ही प्रकरणांमध्ये खटला सुरू राहील. त्याची सुनावणी होऊन शिक्षा सुनावली जाईल.

फाशीच्या शिक्षा जन्मठेपेत रूपांतर :

दोषीला फाशीची शिक्षा दिल्यास त्याच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करता येईल, अशीही मोठी तरतूद नव्या विधेयकात जोडण्यात आली आहे.

न्यायालय देईल अटॅचमेंटचा आदेश :

यापुढे कोणत्याही प्रकरणात मालमत्ता जप्तीचा आदेश न्यायालय देईल, पोलीस अधिकारी हा आदेश देणार नाहीत.

खटल्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध :

सामान्य माणसाला एका क्लिकवर खटल्यांची माहिती मिळू शकेल, त्यामुळे २०२७ पर्यंत देशातील सर्व न्यायालये ऑनलाइन केली जातील जेणेकरून खटल्यांची स्थिती ऑनलाइन मिळू शकेल.

अटक केल्यानंतर कुटुंबाला द्यावी लागेल माहिती :

कोणत्याही परिस्थितीत आरोपीला अटक झाल्यास त्याच्या कुटुंबाला त्या कारवाईची माहिती द्यावी लागेल. एवढेच नाही तर १८० दिवसांत तपास पूर्ण करून चाचणीसाठी पाठवावे लागेल.

खटल्याचा निर्णय १२०दिवसांत :

पोलीस अधिकाऱ्यावर खटला चालवला जात असेल तर त्याबाबतचा निर्णय १२० दिवसांत घ्यावा लागेल. म्हणजे न्यायालयीन खटल्यांचा वेग वाढवण्यात येणार आहे.

वादविवाद संपल्यास महिनाभरात निर्णय :

एखाद्या खटल्यातील वादविवाद संपल्यास न्यायालयाला महिनाभरात निर्णय द्यावा लागेल. ज्या दिवशी निर्णय दिला जाईल त्या दिवसापासून ७ दिवसांच्या आत ते ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे लागेल.

९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल होणार :

मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांना वेगाने काम करावे लागेल. पोलिसांना ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागेल. न्यायालयाने मंजुरी दिल्यास ९० दिवसांपर्यंत मुदत वाढवली जाऊ शकते.

पीडितेच्या जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये लागेल:

लैंगिक हिंसाचाराशी संबंधित प्रकरण असेल तर पीडितेच्या जबाबाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल. हे करणं अनिवार्य असेल.

गुन्ह्याच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जाणं आवश्यक :

ज्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यांच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला त्या घटनास्थळी जाणं अनिवार्य असेल.

अटक न करता घेतला जाणार नमुना :

कोणत्याही परिस्थितीत रक्ताचा नमुना घ्यायचा असेल तर त्यासाठी अटक करणे बंधनकारक नसेल. दंडाधिकार्‍यांच्या आदेशानंतर आरोपीचे हस्ताक्षर, आवाज किंवा फिंगर प्रिंटचे नमुने घेता येतील.

गुन्हेगाराचे रेकॉर्ड होतील डिजिटल :

प्रत्येक पोलीस स्टेशन आणि जिल्ह्यात एक अधिकारी नियुक्त केला जाईल जो गुन्हेगारांच्या काळ्या यादीतील रेकॉर्ड डिजिटल सेव्ह करेल.

Amit Shah
Indian Telegraph Act: १३८ वर्ष जुना कायदा बदलणार; व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, रिलायन्स जिओवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com