Nurul Huda Saam TV News
देश विदेश

Shocking: माजी निवडणूक आयुक्तांच्या गळ्यात बुटांचा हार, अंगावर अंडी फेकली, जमावाचा हल्ला; नेमकं काय घडलं?

Nurul Huda Attacked Amid BNP Allegations: बांगलादेशात माजी निवडणूक आयुक्त नुरुल हुदा यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्यांच्या गळ्यात बुटांचा हार घालण्यात आला. पोलीस हस्तक्षेपानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Bhagyashree Kamble

बांगलादेशात माजी मुख्य निवडणूक आयुक्त नुरुल हुदा यांच्यावर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हल्लादरम्यान त्यांना मारहाण करण्यात आली, गळ्यात बुटांचा हार घालण्यात आला, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर बुटांनी वार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हुदा हे २०१७ ते २०२२ दरम्यान बांगलादेशचे निवडणूक आयुक्त होते. त्यांच्या कार्यकाळात निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने केला आहे. यामुळे त्यांनी हुदा यांच्याघराबाहेर घेराव घालत प्रहार केला. यावेळी जमावाला रोखण्यासाठी पोलीस धावून आले. मात्र, तरीही जमावाकडून हल्ला करण्यात येत होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हुदा यांच्याभोवती गर्दी उभी असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असूनही लोक त्यांच्या चेहऱ्यावर बुटांनी वार करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांना घरगुती कपड्यांवरच ताब्यात घेतलं.

नॉर्थ वेस्ट स्टेशनचे प्रमुख हफिजुर रहमान यांनी सांगितले की, 'हुदा यांना गर्दीने वेढल्याची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले.' ढाका महानगर पोलीस उपायुक्त मोहिदुल इस्लाम म्हणाले, 'बीएनपीने नुरुल हुदा, पंतप्रधान शेख हसीना आणि इतर १८ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हुदा यांना अटक करण्यात आली.'

इतर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुदा यांच्या घरावर जमावाने हल्ला चढवला. पोलिस येण्यापूर्वी त्यांना घराबाहेर ओढून काढण्यात आले, अंगावर अंडी फेकली गेली आणि शिवीगाळ करत सतत मारहाण करण्यात आली. हुदा यांना सध्या गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आले असून, त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Uday: 12 वर्षांनंतर गुरु ग्रहाचा झाला उदय; 'या' राशींना बिझनेसमध्ये होणार नफा

Maharashtra Live News Update: पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Uddhav and Raj Thackeray : शिवसेना-मनसे युती कधी होणार? राज ठाकरेंसोबत चर्चा झाली? उद्धव ठाकरेंनी सगळं सांगून टाकलं

Methi Dal Recipe : गरमागरम भात अन् चटपटीत मेथीची डाळ, रविवारी जेवणाचा खमंग बेत

भयंकर! चिमुकलीवर चालता चालता अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला; VIDEO पाहून हादरुन जाल

SCROLL FOR NEXT