Rahul Gandhi News  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi: खासदार राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

MP/MLA Court Issued Notice to Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर होत आहे.

Gangappa Pujari

Rahul Gandhi News:

मोदी आडनावावरुन कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले होते. हे प्रकरण मिटले असतानाच राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर होत असून या प्रकरणी लखनौ जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे.काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. तसेच राहुल गांधी यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण एमएलए कोर्टाच्या विशेष न्यायाथीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

याआधी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्विकारली आहे.

राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला (Akola) येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी १ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

Vidula Chougule: चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण?

iPhone 15: आयफोन १५ वर मोठी सूट! अमेझॉन फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये मिळेल फक्त 'या' किमतीत

SCROLL FOR NEXT