Miss World 2021 Postponed! भारताच्या मानसा वाराणसीसह 17 स्पर्धकांना कोरोनाची लागण Saam Tv
देश विदेश

Miss World 2021 Postponed! भारताच्या मानसा वाराणसीसह 17 स्पर्धकांना कोरोनाची लागण

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या अनेक सौंदर्यवती, तसेच स्पर्धेशी संबंधित कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचे जगभरामधील वाढते प्रमाण पाहून मिस वर्ल्ड २०२१ (Miss World २०२१) ही स्पर्धा अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या अनेक सौंदर्यवती, तसेच स्पर्धेशी संबंधित कर्मचाऱ्यांना कोविड-१९ चा (Covid-19) संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये भारताची सौंदर्यवती मानसा वाराणसी (Manasa Varanasi) हिचा देखील समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर, मिस वर्ल्ड स्पर्धा सध्या स्थगित करण्यात आली आहे. मानसा वाराणसी मिस इंडिया वर्ल्ड २०२० या स्पर्धेची विजेती ठरली होती. मिस वर्ल्ड २०२१ ही स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून करण्यात आली आहे. आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या १७ व्यक्तींची कोरोना (Corona) टेस्ट पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. त्यामध्ये मानसा वाराणसी हिचा देखील समावेश आहे.

हे देखील पहा-

२३ वर्षांची मानसा मिस इंडिया वर्ल्ड २०२० ची विजेती ठरली होती. ती तेलंगण मधली इंजिनीअर असून, तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला आहे. मिस वर्ल्ड २०२१ या स्पर्धेमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. आरोग्य सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन मिस वर्ल्ड २०२१ ही स्पर्धा अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्यात आली आहे, अशी भूमिका मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांनी जाहीर केली आहे.

तसेच, ९० दिवसांच्या आत प्युअर्टो रिकोमध्ये (Puerto Rico) या स्पर्धेचे नवीन वेळापत्रक ठरवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञ, तसेच प्युअर्टो रिकोच्या आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व संसर्गग्रस्त सौंदर्यवती आणि कर्मचाऱ्यांची आवश्यक ती वैद्यकीय काळजी घेतली जात असून, सुरक्षाविषयक आवश्यक त्या उपाय योजना देखील लागू करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग आणखी पसरू नये, याकरिता आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. अलीकडेच झालेल्या मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेमध्ये भारताच्या हरनाझ संधूने किताब पटकावून इतिहास रचला होता. यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धेचे ७० वर्ष होते. इस्रायलमध्ये इलात या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चंडीगड मधील २१ वर्षांच्या हरनाझने मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकून भारताकरिता २१ वर्षांनी यश मिळवले आहे. १९९४ साली सुष्मिता सेन आणि २००० साली लारा दत्ता या भारतीय सौंदर्यवतींनी मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Pune Accident : स्कूल बसने माय लेकाला उडवले, पोराच्या डोक्यावर चाक गेलं, जागेवर मृत्यू

Sondai Fort: कर्जतच्या हिरव्यागार सौंदर्यात वसलाय सोंडाई किल्ला, जो कोणालाच माहित नाही

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल! पहिल्या प्रयत्नात IPS, दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी, कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT