Children lost for 40 days in Colombian Amazon found alive Saam Tv
देश विदेश

Amazon Forest: अविश्वसनीय! विमान अपघाताच्या ४० दिवसांनी अॅमेझॉनच्या जंगलात ४ मुलं जिवंत सापडली, कसा घेतला शोध?

40 days in Amazon Rainforest: अविश्वसनीय! विमान अपघाताच्या ४० दिवसांनी अॅमेझॉनच्या जंगलात ४ मुलं जिवंत सापडली

Satish Kengar

Colombia Plane Crash: कोलंबियामध्ये ४० दिवसांपूर्वी विमान अपघातानंतर बेपत्ता झालेली चार मुले अॅमेझॉनच्या जंगलात (Amazon Forest) सुरक्षित सापडली आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (Colombia President Gustavo Petro) यांनी शनिवारी ही माहिती दिली.

क्युबाहून बोगोटा येथे परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पेट्रो म्हणाले की, बेपत्ता मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु होती, जी आता संपली आहे. ते म्हणाले की, गेल्या ४० दिवसांपासून या मुलांना शोधण्यासाठी बचाव पथकाने मोठे परिश्रम केले. अखेर यात त्यांना यश मिळालं आहे. ही चारी मुले सुरक्षित असून ते आता वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.''

ते म्हणाले की, ''ही मुले इतक्या भीषण परिस्थितीतही ४० दिवस टिकून राहिले. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांच्या या जगण्याच्या संघर्षाची नोंद इतिहासात केली जाईल.'' असं असलं तरी इतके दिवस ही मुले स्वतःच्या दमावर कशी जगू शकली, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे 1 मे रोजी अपघात झालेल्या सिंगल इंजिन विमानातील सहा प्रवाशांमध्ये चार मुलांचा समावेश होता. अपघातानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला आणि सरकारने प्रवाशांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान बचावकर्त्यांना १६ मे रोजी अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात विमानाचे अवशेष सापडले.

आदिवासींनी केली मदत

अपघातग्रस्त विमानात पायलट आणि दोन प्रौढ प्रवाशांचे मृतदेह सापडले होते. मात्र विमानातील चार मुलांचा शोध लागलेला नव्हता. यानंतर कोलंबियन सैन्याने चार, नऊ, ११ आणि १३ वर्षांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी १५० सैनिक स्निफर डॉगसह जंगलात पाठवले.

यातच आदिवासी समाजातील अनेक सदस्यांनीही शोध मोहिमेत सहकार्य केले. शुक्रवारी सैन्याने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ही मुलं ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली सैनिक आणि आदिवासी स्वयंसेवकांसोबत दिसत आहेत. एका फोटोत एक सैनिक यातील सर्वात लहान मुलाला बाटलीने दूध पाजताना दिसत आहे.

दरम्यान, वायुसेनेने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये सैनिक मुलांना हेलिकॉप्टरमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, हेलिकॉप्टर मुलांसह सॅन जोस डेल ग्वाविअरला रवाना झाले होते. शोध मोहिमेदरम्यान, या मुलांना खायला मिळेल आणि जगता येईल या आशेने सैन्याने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी अन्नाची पाकिटे टाकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT