Amit Shah
Amit Shah saam tv
देश विदेश

Hanuman Jayanti Advisory: हनुमान जयंतीला समाजकंटकावर करडी नजर; केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्व राज्यांसाठी अॅडव्हायझरी

साम टिव्ही ब्युरो

New Delhi: देशातील अनेक भागात राम नवमीच्या दिवशी गोंधळ झाल्याच्या घटना घडल्या. या घटनेत समाज कटंकामुळं अनेक नागरिकांचं नुकसान झालं. या घटनांमुळे काही भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळे अमित शहा यांचं केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झालं असून हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. यंदा हनुमान जयंती ६ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

देशात यावेळी रामनवमीच्या दिवशी बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगालमध्ये गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला. या घटना घडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. या आधी देखील केंद्र सरकारने सणांच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायझरी जारी केल्या आहेत. हनुमान जयंतीदिनी काही विपरीत घटना घडल्यास सहन केल्या जाणार नाही, असा इशाराच देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये गोंधळ

रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम बंगालच्या बंगालच्या हुगळीमध्ये देखील राडा झाला होता. बिहारमध्ये देखील काहीसा असाच प्रकार घडला होता.

कोलकाता हायकोर्टाचा आदेश

कोलकाता हायकोर्टाने हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदेश दिला आहे. हायकोर्टाने बंगाल सरकारला केंद्र सरकारला पॅरामिलिट्री फोर्स मागविण्याचे आदेश दिले आहेत. बंगाल सरकारकडे पोलीसाचं फोर्स कमी असल्याने आदेश दिले आहेत. नागिराकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत जयंतीच्या एक दिवस आधीच फ्लॅग मार्च

दरम्यान, दिल्लीत हनुमान जयंतीच्या एक दिवस आधीच दिल्ली पोलिसांनी फ्लॅग मार्च केला. पोलिसांनी हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरी भागात यात्रा किंवा रॅली काढण्यास विश्व हिंदू परिषद आणि अन्य समूहाला परवानगी दिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT