Telangana News: PM मोदींच्या तेलंगणा दौऱ्याआधी भाजप प्रदेशाध्यक्षांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, गोंधळ घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार; VIDEO

Political News : PM मोदींच्या तेलंगणा दौऱ्याआधी भाजप प्रदेशाध्यक्षांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ANI
ANI

Telangana News: भारतीय जनता पक्षाचे (BJP) तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संजय कुमार यांना त्यांच्या राहत्या घरातून बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतलं आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध मोठा विरोध केला होता. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच तेलंगणामध्ये राजकीय तापमान वाढलं आहे.

ANI
Jalana Jowar Farmer Song | पारंपरिक 'भलरी'गीत गात कष्टकरी मजूर ज्वारी सोगणीच्या कामात मग्न

भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील जानगाव येथे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला आहे. पोलीस संजय यांना वैद्यकीय तपासणीसाठी पालकुर्ती येथील रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमले होते. जमावाला नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. (Latest Marathi News)

ANI
Dombivli School Bus Accident | म्हात्रे स्कूलच्या सहलीला गेलेल्या बसचा मोठा अपघात

नेमकं काय आहे प्रकरण?

इयत्ता दहावीचा एसएससी पेपर लीक प्रकरणी बंदी संजय कुमार यांनी सरकारविरोधात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. (Telangana Latest News)

भाजपचे तेलंगणा प्रदेश सरचिटणीस प्रेमेंद्र रेड्डी यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. तेलंगणा सरकार पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com