Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमध्ये डंपर दरीत कोसळला, तिघांचा जागीच मृत्यू

Latest News : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात हा अपघात (Dumpur Accident) झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
Himachal Pradesh Accident
Himachal Pradesh Accident Saam Tv
Published On

Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) डंपर दरीत कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात हा अपघात (Dumpur Accident) झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये डंपरमध्ये असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Himachal Pradesh Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताच तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Himachal Pradesh Accident
Donald Trump Case : अ‍ॅडल्ट स्टार प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची जामीनावर सुटका, भरावा लागणार 1.22 लाख डॉलर्सचा दंड!

मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातल्या निरमंड येथील बागीपुल-नोर रोडवर मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. खडी घेऊन जाणारा डंपर २०० मीटर खोल दरीमध्ये कोसळला. हा डंपर खडी घेऊन नोरेच्या दिशेने जात होता. चालकाचा डंपरवरील ताबा सुटला असावा आणि हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामध्ये डंपरचे दोन तुकडे झाले. अपघातामध्ये डंपर चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Himachal Pradesh Accident
NCERT Syllabus Change: विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून 'मुघल साम्राज्या'चा इतिहास होणार गायब, जाणून घ्या काय आहे कारण

आज सकाळी काही ग्रामस्थांना डंपर दरीमध्ये कोसळल्याचो दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अपघातानंतर नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. तर अन्य दोघांचे मृतदेह डंपरच्या जवळ सापडले. पोलिसांनी तिघांचे देखील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Himachal Pradesh Accident
Kerala Train Fire Update: कोझिकोड ट्रेन जळीतकांडातील आरोपी रत्नागिरीत, तिघांचा जीव घेणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटलेली आहे. गुड्डू, रणजीत ठाकूर आणि अंकित अशी मृतांची नावं आहेत. हे तिघे देखील निरमंड येथील मोहन गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com