Donald Trump Case : अ‍ॅडल्ट स्टार प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची जामीनावर सुटका, भरावा लागणार 1.22 लाख डॉलर्सचा दंड!

Adult Film Star Case : ट्रम्प यांची जामीनावर सुटका झाली असली तरी देखील त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत.
Donald Trump
Donald TrumpSaam Tv
Published On

Stormy Daniels Case : पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल (Stormy Daniels) प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळारी रात्री अटक करण्यात आली होती. पण अटकेनंतर काही वेळातच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. ट्रम्प यांची जामीनावर सुटका झाली असली तरी देखील त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. याप्रकरणात त्यांना कोर्टाने तब्बल 1 लाख 22 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे.

Donald Trump
Who is Stormy Daniels: स्टॉर्मी डॅनियल कोण आहे? जिला हॉटेलात बोलवून फसले डोनाल्ड ट्रम्प, वाचा सविस्तर...

अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात पोर्न स्टारला पैसे देऊन शांत केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टात हजर करण्यात आले. पण काही वेळातच त्यांची जामीनावर सुटका झाली. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला खरा पण कोर्टाने त्यांना 1 लाख 22 हजार डॉलरचा दंड भरण्याचे आदेश दिले. ही दंडाची रक्कम पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Donald Trump
Forbes Billionaires List 2023 : मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी किती आहेत मागे? जाणून घ्या

कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प जवळपास तासभर न्यूयॉर्क कोर्टात हजर होते. कोर्टासमोर त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले. तसंच त्यांनी मी दोषी नसल्याची कबुली दिली. ट्रम्प यांनी या प्रकरणात त्यांच्यावर केलेले सर्वच्या सर्व 34 आरोप फेटाळून लावत ते चुकीचे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

एखाद्या प्रकरणात अशाप्रकारे अटक होणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणात अटक झाल्यानंत अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण देशभरामध्ये होत आहे.

Donald Trump
India Corona Update: कोरोना फोफावला! देशात 24 तासांत 4,435 रुग्णांची नोंद

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे हे प्रकरण अमेरिकेत 2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीचे आहे. ट्रम्प यांनी त्यावेळी पॉर्न स्टारला कथित संबंधांबद्दल कोणताही खुलासा करु नये आणि याबद्दलची वाच्यता कुठेही करु नये यासाठी पैसे दिले होते. ट्रम्प यांनी त्याचे तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने पॉर्न स्टरला तब्बल 1 लाख 30 हजार डॉलर्स ऐवढी मोठी रक्कम दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com