Asia's Richest Person: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. यातच मुकेश अंबानी यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी या यादीत 24 व्या क्रमांकावर घसरले आहेत. तत्पूर्वी गौतम अदानी 24 जानेवारी रोजी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी अदानी यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलर्स असून ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे. (Latest Marathi News)
फोर्ब्सच्या यादीनुसार, शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. तर सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla Net Worth) हे देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यातच स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमाणी आठव्या क्रमांकावर आहेत. (Mukesh Ambani Latest News)
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती 2,100 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2022 मध्ये हा आकडा 2,300 अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.