IPS officer Accident X
देश विदेश

Hyderabad Video: बंदोबस्तावर तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्याने चिरडलं, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

IPS officer Accident : पोलीस अधिकारी परितोष पंकज हे भद्राचलम येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी मंत्र्यांच्या ताफ्यामधील एका कारने त्यांना चिरडलं.

Bharat Jadhav

Hyderabad Minister Convoy Hit IPS Officer :

मंत्र्यांच्या ताफ्याला वाट करून देणाऱ्या एका सहाय्यक पोलीस अधीक्षकाला ताफ्यातील कारने चिरडल्याची घटना तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्हा घडलीय. परितोष पंकज असं या पोली अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकारी परितोष पंकज हे भद्राचलम येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी मंत्र्यांच्या ताफ्यामधील एका कारने त्यांना चिरडलं. (Latest News)

राज्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करून देताना ताफ्यातील एका कारने त्यांना मागून धडक दिली, त्यानंतर ते खाली पडले. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलीस अधिकारी पंकज यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांचा ताफा होता त्या मंत्र्यांना मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासोबत एका कार्यक्रमला जायचं होतं मात्र, मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी लवकर पोहोचले होते. त्यामुळे घाईत असलेल्या मंत्र्यांच्या ताफ्याने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस अधिकारी परितोष यांना किरकोळ दुखापत झालीये. त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'ते ठीक आहेत. त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ एक लहान फ्रॅक्चर झाले होते आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, मंत्र्यांच्या ताफ्यात प्रवेश केल्यानंतर पंकज आपल्या सहकाऱ्यांना बॅरिकेड बंद करण्याचे निर्देश देत होते. त्याचवेळी ते रस्त्याच्या मधोमध आले. त्यावेळी ताफ्यातील एक कार त्यांच्यापाठीमागून आली. कार चालकाला कळण्याआधी कारने पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं.

व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी धावताना दिसत आहेत, त्यानंतर ते रस्त्याच्या मधोमध आले. त्यानंतर मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. कारची धडक बसतात ते रस्त्याच्या बाजुला फेकल्या गेले. त्यानंतर लगेचच घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस त्यांना वाचवण्यासाठी धावले, त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT