Mahad : कष्टाने घेतलेली माेटारसायकल परत मिळाल्याने त्यांचे चेहरे आनंदाने फुलले, महाड पाेलिसांकडून 11 वाहन मूळ मालकांना परत

Raigad Latest Marathi News : पोलिसांनी यशस्वी तपास करून दुचाकी परत मिळवून दिल्याबद्दल वाहनांच्या मालकांनी समाधान व्यक्त केल आहे.
bike thieves arrested 11 two wheelers recovered returned to owners
bike thieves arrested 11 two wheelers recovered returned to ownerssaam tv

- सचिन कदम

Mahad News :

दुचाकी चोरीला गेल्यानंतर ती परत मिळेलच याची अपेक्षा फारसे काेणी करत नाही. पण महाड तालुक्यात रायगडचे पाेलिस अधिक्षक साेमनाथ घार्गे यांनी मूूळ मालकांना त्यांच्या चाेरीस गेलेल्या दुचाकी नुकत्याच मिळवून दिल्या. या दुचाकींच्या चाव्या हातात पडताच मालकांच्या चेह-यावर समाधानाचे भाव पसरले. (Maharashtra News)

महाड विभागात दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. महाड एमआयडीसी पोलिसांनी चाे-यांवर आळा बसावा यासाठी पथके स्थापन केली हाेती. पाेलिसांनी पाठलाग करून सागर विरेंद्रसिंग (सोळंकी, राहणार आदर्शनगर, बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली.

bike thieves arrested 11 two wheelers recovered returned to owners
Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

त्याची अधिक चौकशी केली असता त्याने युवराज विठोबा जगताप (राहणार. साकडी, ता. महाड, जि. रायगड) व सुहास रमेश नाईलकर (राहणार रूपवली, ता. महाड, जि. रायगड) यांचे सोबत मिळून मोटार सायकल चोरी केल्याची कबूली दिली. या आराेपींकडून दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

bike thieves arrested 11 two wheelers recovered returned to owners
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

पाेलिसांनी हस्तगत केलेल्या दुचाकींपैकी 11 वाहनं आज (मंगळवार) महाड तालुका पोलिस ठाण्यात एका छोटे खानी कार्यक्रमात रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते मूळ मालकांना स्वाधिन करण्यात आल्या. दुचाकी चोरीला गेल्यानंतर ती परत मिळेल याची अपेक्षा सोडल्या चेहर सांगत, पोलिसांनी यशस्वी तपास करून दुचाकी परत मिळवून दिल्याबद्दल वाहनांच्या मालकांनी समाधान व्यक्त केल आहे.

Edited By : Siddharth Latkar

bike thieves arrested 11 two wheelers recovered returned to owners
Ajit Pawar : यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत : अजित पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com